धर्माबाद (अहमद लड्डा) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनी च्या कार्यकारी अभियंताला दिलेल्या निवेदनात धर्माबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी धर्माबाद शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे वाढीव वीज बिल माफ करणे विषयी आग्रहाची विनंती केली आहे. कोविड -19 च्या कोरोना ह्या ह्या जीवघेण्या आजारामुळे शहरातील व ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाकली असून लॉकडाऊन च्या कालावधीचा जवळजवळ पाच महिने होत असून शहरातील 70 ते 75 टक्के जनता ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवित आहे.गेल्या पाच महीन्यापासून त्यांना काम नसल्याने त्यांच्यावर अगोदरच उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यामुळे ते अधिक भार पेलू शकत नसल्यामुळे त्यांना वाढीव विज बिल माफ करून सहकार्य करावे . व विज बिल न भरल्यामुळे तालुक्यात कोणाचेही वीज पुरवठा खंडित करू नये.असे केल्यास मनसे स्टाईल ने आंदोलन करू.ह्याची मेहरबान साहेबांनी नोंद घ्यावी. असेही मनसे अध्यक्ष श्री कावडे यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले. कोरोना चा वाढता संसर्ग पाहता सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री कावडे यांनी निवेदन सादर केले आहे.
COMMENTS