*कोरोनाचा प्रादुर्भाव
धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना महामारीच्या या काळात शहराची नाजूक स्थिती आहे. असे असताना धर्माबाद नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही ही शोकांतिका आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची बदली श्रीगोंदा नगर परिषद येथे झाली.विद्यमान परिस्थिती मध्ये धर्माबाद नगर परिषदेचा कारभार पाहण्यासाठी उमरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या कडे अतिरिक्त पदभार सोपविला आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसणे ही धर्माबादकरांची थट्टा आहे. शहरातील विकास कामे तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठे नुकसान होत आहे.
कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी पालिका,महसूल,पोलीस, आरोग्य विभाग यांच्यात ताळमेळ बसवून समन्वय साधून महामारीवर मात करणे शक्य होते. अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी आहे. मुख्याधिकारी असताना कंटेनमेंट झोनमध्ये बॅरिकेट्स लावणे, सॅनिटाईज करणे व इतरही समस्या त्वरित सोडविल्या जात होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची विकास कामे पूर्ण करण्यात येत होती. सद्य:स्थितीला धर्माबाद पालिकेला कोणीच वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना कधीही फोन लावला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत होता.
मुख्याधिकारी मंगेश देवरे पदावर असताना विकास कामांना चालना मिळाली होती. सध्या विविध विकास कामे रखडली आहेत, प्रतिबंध क्षेत्रात निर्जंतुकीकरण, साफ-सफाई नाही विद्यमान परिस्थिती मध्ये कोरोना बाधित झाल्याची संख्या 31 वर येवून ठेपली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव तात्काळ रोखण्यासाठी धर्माबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असे निवेदन पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष डॉ.सुधीर येलमे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगर विकास मंत्री यांच्या कडे धर्माबाद तहसीलदार यांच्या मार्फत मागणी केली आहे.
COMMENTS