त्या विवाहित महिलेच्याआत्महत्या प्रकारणाचा तपास चकलांबा पोलिसांकडून काढून घ्यावा 

 


चकलांबा पोलीसांना आरोपींकडून आर्थिक पाठबळ


 


मादळमोही दि.२९ (संतोष भारती):- बीड जिल्ह्यातील फुलसांगवी (ता. शिरूर कासार) येथील रेखा तळेकर या विवाहित महिलेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या नसुन माझ्या मुलीचा घातपात केला असल्याचा आरोप मुलीच्या वडील यांनी केला आहे. दरम्यान या घटनेचा तपास चकलांबा येथील स्थानिक पोलिसांकडून काढून घ्यावा अशी लेखी तक्रार दि.२९ जूलै रोजी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मुलीचे नातेवाईक रामनाथ जाधव यांनी केली. या अश्या प्रकारच्या मागणीमुळे चकलांबा पोलिसांची निष्क्रियता समोर येत आहे.


    पंचमीच्या सणाच्या धामधुमीत फुलसांगवी (ता. शिरूर कासार) येथील रेखा तळेकर या विवाहित महिलेसह तीन वर्षाचा संचित या मुलांचा गावातील विहिरीत संशयास्पद हत्या झाल्यांची घटना दि.२७ जूलै रोजी चकलांबा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. कारण ही घटना सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केलेली नसुन माझ्या मुलीचा घातपात केला असल्याचा आरोप मुलीच्या वडील यांनी केल्यानंतर संशय जास्त प्रमाणात वाढला. कारण रेखा तळेकरला सतत होणाऱ्या मारहाण, जाच आणि छळ होत होता. तसेच दि.२७ जुलै २०२० रोजी ही रेखा च्या घरच्या लोकांनी अमानुष अत्याचार, मारहाण केली आहे. हे तिच्या शरीराच्या मृत्यदेहावरून दिसून आले. तसेच सदर ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी गावात रात्रभर होते. त्यानंतर हे आरोपी अंत्यविधीला हजर राहिले नसून घरात बसून होते. आमच्या मुलींची हत्या केली आहे घातपात आहे असे उपस्थित असणाऱ्या पोलिसांना वांरवांर सांगूनही सर्व आरोपींना कसल्या प्रकारची चौकशी चकलांबा पोलीस यांनी केली नाही. तसेच ठाण्यात गुन्हा नोंद झाला असुनही आरोपींना चकलांबा पोलिसांनी अटक केली नाही. बहुतांश नातेवाईकांनी ह्या घटनेचे शवविच्छेदन इनकँमेरा करावे ही मागणी पोलिसांनी मान्य केली नाही. यामुळे माझी चकलांबा पोलीस मधील यंत्रणेवर विश्वास राहिला नाही. तरी त्यांनी आरोपीला पळवून लावण्यासाठी वेळ दिला असून मदत केली आहे. म्हणून माझी न्याय मिळवण्यासाठी आपणास विनंती आहे की चकलांबा पोलिस यांच्याकडील तपास काढून गुन्हे शाखा विभागाकडे देण्यात यावा व आरोपी लवकरात लवकर अटक करावी अशी लेखी तक्रार दि.२९ जूलै २०२० रोजी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मुलीचे नातेवाईक रामनाथ जाधव यांनी केली. 



  • पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष...


-----------------------


चकलांबा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील उमापूर, राक्षसनूभवन, फुलसांगवी, तिंतरवणी, कोळगांव, तांदळा, बंगाली पिपळा, खळेगाव, माटेगाव आदी गावात बेकायदेशीर दारू विक्री, मटका, बेसुमार वाळू उपसा आणि वाहतूक आदी प्रकारच्या अवैध धंद्याने स्थान बसवले आहे. यामुळे चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. महिला अत्याचार, मारहाण घटना वाढ होत आहे. फुलसांगवी सारख्या कायद्याचा धाक नसल्यामुळे महिलांची घातपात होत आहे. पण चकलांबा पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. आरोपी बरोबर लागेबांध करत आहे. अश्या प्रकारे चकलांबा पोलीसांना हप्तेगिरीची लागण झाल्यामुळे हे माफिया उधळ माथ्याने असे अवैध धंदे चालू असतांना चकलांबा पोलीस कर्मचारी या मलाईदार धद्याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करित असल्याने प्रशासनाच्या नाकावर टिचुन हा गोरख धंदा करित असतांना पोलीस मात्र या कडे वरिष्ठ पोलीस अधिकारी, एस.पी दुर्लक्ष करित आहेत. 


चैकट


पोलिस अधीक्षक साहेब चंकलंबा पोलिस ठाण्याकडे लक्ष द्या!


--------------------------------------------


चंकलंबा पोलिस ठाण्याच्या हाद्दीत सतत चोर्या हाणामार्या व मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी बळावली आहे,पोलिस दुर्लक्ष करत असुन फिर्यादी ऐवज आरोप्याचे लाड करत आहेत, त्यामुळे पोलिसा वरील विश्वासहर्ता कमी होत आहे, याला वेळीच चाप लावला नाही, तर गुन्हेगारी बळवु शकते तुम्ही तरी विशेष लक्ष द्या अशी मागणी होत आहे,


टिप्पण्या