गुरुकुल विद्यालय धर्माबाद चा निकाल 100%


 


धर्माबाद (अहमद लड्डा)


येथील गुरुकुल विद्यालय धर्माबाद चा निकाल दरवर्षीप्रमाणे ऊल्लेखनीय कामगिरी करत शंभर टक्के लागलेला आहे.तालुक्यातून मराठी माध्यमातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. यावर्षी विद्यालयातून एकूण 84 विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षेला बसलेले होते. हे सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.


 


विद्यालयातून प्रथम शिंदे वैष्णवी हणमंत,95.80%गुण, द्वितीय मदनुरकर संकेत बिरप्पा,94.20%गुण, तृतीय रेणगुंटवार लोकेश संतोष ,92.80%गुण,त्याच बरोबर वाघमारे शुभांगी निलेश,92.20%गुण, सूर्यवंशी तितिक्षा दिगांबर 91.80गुण,शिंपाळे पल्लवी शिवाजी,90.00%गुण यांनीदेखील उल्लेखनीय यश मिळवले आहे .विद्यालयातून विशेष योग्यता मध्ये 37 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत .या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री रामराव आगलावे, सचिव सौ शोभा गोपतवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनमोहन कदम, सहशिक्षक सौ बाबळे अनुसया ,सौ कुरे पाटील अपर्णा, सौ करुणा सुवर्णकार, श्री लासिनकर बालाजी ,श्री कवडे अभिजीत, श्री नरडेवाड श्रीनिवास श्री बनसोडे लक्ष्मण,मार्गदर्शक श्री गोपतवाड गजानन, कु.स्नेहलता जगदंबे लिपिक श्री रटकलकर शिवदास,सेवक विठ्ठल चिमलवाड संतोष सोनटक्के यांनी केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


टिप्पण्या