*
माजलगाव/भास्कर गिरी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत केसापुरी वसाहत येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९५.०४ टक्के लागला असून राधिका चत्रभुज गवळी ९५.८०, प्रणवकुमार पुरूषोत्तम काठुळे ९२.४०, श्रृतिका गणेश महाजन ९१.००, आबासाहेब दगडुबा वाडकर ९०.४०, आरती नवनाथ चव्हाण ९०.०० असे गुण घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना ए.आर.इबिते, एम.एन.मसलेकर, पी.एन.देशपांडे, बी.बी.वायबसे, जी.एल.गंडगे, डी.एन.देशमुख, डी.सी.शेंडगे, एस.पी.कुलकर्णी, बी.बी.बनसोडे, यु.आर.वाले, ए.बी.शिंगणे, एस.आर.कोडगिरकर, एल.ए.भोले यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नवविकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.आर.शर्मा, कार्यवाह मा.आ.डी.के.देशमुख, शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.आर.डी.भिलेगावकर, संचालक ॲड.एस.बी.मुळी, ॲड.ए.एम.मोगरेकर, आर.बी.देशमुख, जी.एल.जोशी, मुख्याध्यापक अभिमन्यु इबिते, पर्यवेक्षक के.एल.मोताळे यांनी अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS