हिंगोली शहरात बनावट लायसन्सच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक (DIG) श्री शहाजी उमा...
हिंगोली शहरात बनावट लायसन्सच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक (DIG) श्री शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धाड टाकली आहे. या धडक कारवाईत १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, रोकड व वाहनांसह तब्बल १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी DIG शहाजी उमाप यांनी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंक्य सुदामराव नागरे याच्या कॉम्प्लेक्समधील पत्र्याच्या गाळ्यात छापा टाकला. त्यावेळी तेथे ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले.
तपासणीदरम्यान, 'दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे' या नावाच्या लायसन्सचा आडोसा घेऊन अजिंक्य नागरे हा बेकायदेशीर जुगार चालवत असल्याचे उघडकीस आले.
जप्त केलेला मुद्देमाल
नगद रक्कम: २,१६,०२० रुपये
मोबाईल संच: १५ मोबाईल
वाहने: १ चारचाकी वाहन आणि ८ मोटारसायकली
एकूण मुद्देमाल: १८,४७,०२० रुपये
मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६९१/२०२६, कलम ४ व ५ (मुंबई जुगार कायदा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) बनसोडे करत आहेत.
पथकाची धडक कामगिरी ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड आणि गजानन डवरे यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल DIG शहाजी उमाप यांनी पथकाचे विशेष अभिनंदन केले.
'खबर' हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांची गोपनीय माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ९१ ५० १०० १०० हा व्हॉट्सॲप/मोबाईल क्रमांक 'खबर' हेल्पलाइन म्हणून सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती या क्रमांकावर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन DIG शहाजी उमाप यांनी केले आहे.

COMMENTS