पिण्याचे पाणी जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न गंभीर
नांदेड : अर्धा पावसाळा होऊन गेला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास वाया घालण्याची भीती निर्माण झाली आहे फुल,शेंगा अवस्थेत असलेली पिके पिके वाजताना पाहून शेतकरी कमालीचा अहवाल दिन झाला असल्याने शासनाने मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनाप्रमुख शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.
राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. अर्धा पावसाळा होत आला तरीही एकाही नदी नाल्याला पूर आला नाही. अनेक विहिरी अद्याप कोरड्याच आहेत. भविष्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यांचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे शासनाने तात्काळ मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग करावेत जेणेकरून ज्या भागात दगड आले त्या भागात तरी पाऊस पडेल व काही आमची शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मूग, उडीद, सोयाबीन,ज्वारी, कापूस तूर आदी खरिपाची पिके पूर्णतः वाया जाण्याच्या मार्गावर आहेत हळद, केळी ऊस पपई यांची ही वाढ पूर्णता खुंटली असून भविष्यात अन्नधान्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने विना विलंब मराठवाड्यात तातडीने कृत्रिम पावसाचे प्रयोग करावेत असे मागणी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे.

COMMENTS