माहूर (प्रतिनीधी ) श्रावणमास समाप्ती निमित्त श्री रेणुकामाता मंदिरात मंगळवार दि.8 सप्टेंबर रोजी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव,विनायक ...
माहूर (प्रतिनीधी ) श्रावणमास समाप्ती निमित्त श्री रेणुकामाता मंदिरात मंगळवार दि.8 सप्टेंबर रोजी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव,विनायक फांदाडे, यांच्या हस्ते श्री रेणुका मातेला रुद्राभिषेक, सिंदूर लेखन महावस्त्र परिधान करून पारंपारिक अलंकार चढविण्यात आल्यांनंतर पोरीचा महानैवेद्य महाआरती अलंकार महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त आशिष जोशी,अरविंद देव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी,पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप यांची गाभाऱ्यात उपस्थिती होती.
त्यानंतर शिखर संस्थानच्या महापुरुषांचा सन्मान करुन त्यांचे आदरातिथ्य करण्यात आले. यावेळी संस्थांतर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आले. या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य,वे.शा.स.रविंद्र कान्नव यांनी केले यावेळी, पुजारी अनिल कान्नव,वल्लभ आमले,मंगेश रीठे,राजु कान्नव,सागर देव,विजय कोरटकर, मनोज बनसोडे, विपुल कान्नव,गणेश संतान,सागर कान्नव,यांचेसह ब्रह्मवृंद पुजारी संस्थानचे व्यवस्थापक विजय राऊत,सुरक्षा रक्षक महादेव मुंडे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS