नांदेड : शहरातील गणेश नगर मधील श्री गणेश मंदिरात गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेच्या सांगता दिनी परि...
नांदेड : शहरातील गणेश नगर मधील श्री गणेश मंदिरात गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेच्या सांगता दिनी परिसरात श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. शिवमहापुराणातील विविध प्रसंग, भगवान शिवाचे महात्म्य, भक्तीची शक्ती आणि मानवी जीवनाला दिशा देणारे विचार यांचे अत्यंत रसाळ व भावपूर्ण निरूपण करण्यात आलेसंगीतमय समर्थ भक्त श्री. राघवेंद्र महाराज देशपांडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने शिवमहापुराणातील कथाभाग भक्तांसमोर सादर केला. त्यांच्या कथनाला भावपूर्ण संगीताची साथ लाभल्याने संपूर्ण वातावरण शिवभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. तबला : आदित्य उपाध्ये आणि पेटी : दत्तात्रय वर्तक यांच्या सुरेल साथीने कथेला अधिकच भावस्पर्शी उंची प्राप्त झाली. कथा, अभंग, भजन, श्लोक आणि संगीताच्या माध्यमातून भक्तांना भगवान शिवाच्या स्वरूपाचे आध्यात्मिक दर्शन घडले.
शिवमहापुराण हे केवळ पुराणकथांचे संकलन नसून, शिव हे विश्वाचे मूळ तत्व असून, मानवी जीवन जगण्याची मूल्यदृष्टी देणारा आध्यात्मिक ग्रंथ आहे. अहंकाराचा त्याग, सत्याचा मार्ग, संयम, परोपकार, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व या कथेतून अधोरेखित करण्यात आले. भगवान शिव हे संहाराचे नव्हे, तर अहंकाराचा संहार करून कल्याणाचा मार्ग दाखविणारे देव असल्याचा संदेश कथेतून देण्यात आला.
शिवमहापूराण ग्रंथात एकूण ६ सहिता, १४ खंड व २४,००० श्लोक आहेत. यामधील कथांचा बोध आपल्या दैनंदिन जीवनात जोडला तर जीवनाचा उद्धार नक्की होईल. जगातील शिवमंदिरे व ज्योतिर्लिंग सत्यघटनांची साक्षीदार आहेत, उर्जामंत्री आहेत.
कथेच्या अंतिम टप्प्यात भक्तिमय वातावरण अधिकच उत्कट झाले. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी एकाग्रतेने कथा श्रवण करत आध्यात्मिक अनुभूती घेतली. सांगता प्रसंगी शिवमहापुराणाच्या श्रवणातून मिळालेली शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संदेश देण्यात आला.
संगीत, कथा आणि भक्तीचा सुरेल त्रिवेणी संगम साधत झालेला हा शिवमहापुराण सांगता सोहळा भाविकांच्या स्मरणात कायम राहणारा ठरला. श्रद्धेने भारावलेल्या वातावरणात ‘हर हर महादेव’च्या जयघोषात कथेची भक्तिमय सांगता झाली.
या कथेच्या आयोजनात साठी गणेश मंदिर समितीचे संचालक सतिश सामते, प्रविण चिद्दरवार, हर्षद पाटील, प्रा.सतीश पोतदार, पत्तेवार, तुप्तेवार, काप्रतवार, सतिश शिरूरकर,पाठक, कंकाळ, कुर्तडीकर,गणेशनगर महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले

COMMENTS