नांदेड: शहरातील फुले मार्केट परिसरातील ‘वेलनेस स्पा’ (Wellness Spa) या सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष...
नांदेड: शहरातील फुले मार्केट परिसरातील ‘वेलनेस स्पा’ (Wellness Spa) या सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने संयुक्त कारवाई करत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराज्यीय देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यादरम्यान ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर स्पा मालक पसार झाला आहे.
बोगस ग्राहकाद्वारे टाकली धाड
पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना फुले मार्केट परिसरातील वेलनेस स्पा सेंटरमध्ये अवैध देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून बोगस ग्राहक पाठवण्यात आला. खात्री पटताच १ सप्टेंबर २०२६ च्या रात्री पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला.
नेपाळ व इतर राज्यांतील महिलांची सुटका
या कारवाईत नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे आणि पुणे येथील ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून १,७१,९२० रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
आरोपींवर गुन्हे दाखल
या प्रकरणी पुढील आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत:
हिफजुर रहमान आरिफ उद्दीन (वय २०, रा. होजाई, नागाव, आसाम) – मॅनेजर (अटक)
महाज उद्दीन रफीक उद्दीन (वय २०, रा. होजाई, नागाव, आसाम) – (अटक)
याहीया अहमद अब्दुल वाहीद (वय १९, रा. होजाई, नागाव, आसाम) – (अटक)
संतोष बघे (स्पा मालक) – (फरार)
आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात PITA कायदा व भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार मालकाचा शोध सुरू आहे.

COMMENTS