नांदेड: (दि. १० ऑगस्ट २०२६ ) वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता ...
नांदेड: (दि. १० ऑगस्ट २०२६ ) वर्तमानकाळातील वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरत असतो. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका इतिहासाच्या अभ्यासातून टाळता येतात; त्या टाळल्या तर भविष्यकाळ उज्वल ठरतो, असे उद्गार महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ.सोमनाथ रोडे यांनी यशवंत महाविद्यालयातील इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने सत्रारंभ कार्यक्रमामध्ये 'इतिहास विषयातील करिअर व संधी' या विषयावर साधनव्यक्ती तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. यशवंत महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतिहास विषयातील अध्ययनाच्या विविध पैलूंबरोबरच उच्च शिक्षण, संशोधन व रोजगाराच्या उपलब्ध संधींची माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना डाँ. सोमनाथ रोडे म्हणाले की, इतिहास हा विषय शालेय स्तरापासून शिकवला जात असल्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात व तसेच संशोधनाच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत तसेच इतिहासात केवळ भूतकाळाचा अभ्यास करणारा विषय नसून त्यामध्ये विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, इतिहास विषयाचे स्पर्धा परीक्षेमध्ये असलेले महत्त्व अधोरेखित करत इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी इतिहासातील मूळ ग्रंथांचे वाचन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास हा विषय निवडून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासांती स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यास मोठे अधिकारपद प्राप्त होऊ शकते.
प्रारंभी प्रास्ताविकात इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांनी, इतिहास विभागाच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती देत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
डॉ. संगीता शिंदे(ढेंगळे) यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. साईनाथ बिंदगे यांनी केले, तर प्रा. राजश्री भोपाळे यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ. शीतल सावंत यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.

COMMENTS