नांदेड,३१- इसाप प्रकाशन आणि श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बिजूर (ता. बिलोली) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राम वाघमारे लिखित ‘थोडेसे भारत...
नांदेड,३१- इसाप प्रकाशन आणि श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बिजूर (ता. बिलोली) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राम वाघमारे लिखित ‘थोडेसे भारताबाहेर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रसिद्ध कवी शिवाजी अंबुलगेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, साहित्यिक डॉ. पी. विठ्ठल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. गायत्री पांपटवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
थोडेसे भारताबाहेर या पुस्तकातून लेखक डॉ. राम वाघमारे यांनी भारताबाहेरील प्रवासादरम्यान आलेले अनुभव, विविध देशांची संस्कृती, जीवनशैली आणि तेथील वैशिष्ट्यांचा वेध घेतला आहे. प्रवासवर्णनाच्या माध्यमातून वाचकांना भारताबाहेरील जगाची ओळख करून देणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, वाचक आणि प्रवासविषयक लेखनात रस असणाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तरटे करणार आहेत. या कार्यक्रमास साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्यवहारे, भारत दाढेल, डॉ. भगवान सूर्यवंशी यांनी केले आहे.

COMMENTS