NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात लातूर, दि. 10 : NEET परीक्षेतील कथित पेपरफु...
NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश; तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात
लातूर, दि. 10 : NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाने लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून नाव चर्चेत असलेले प्रा. शिवराज मोटेगावकर आणि डॉ. शिरुरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या RCC क्लासेसवर बंदी घालावी, तसेच डॉ. शिरुरे यांचे रुग्णालय सील करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय NEET प्रकरणातील सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या मागण्यांसाठी सतीश कारंडे यांच्यासह चळवळीतील सहकारी आणि विद्यार्थ्यांनी रविवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून लातूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
NEET परीक्षेच्या कथित गैरप्रकारामुळे शासनाला पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आली. या दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी शासनाचा झालेला खर्च संबंधित आरोपींकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलनकर्त्यांनी प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या RCC क्लासेसवर बंदी घालावी.डॉ. शिरुरे यांचे रुग्णालय सील करावे.NEET प्रकरणातील सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.शासनाला दुसऱ्यांदा परीक्षा घेण्यासाठी झालेला खर्च संबंधित आरोपींकडून वसूल करावा.NEET प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आधी मागण्या करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शासनावरील विश्वास आणखी ढासळेल, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

COMMENTS