पिठापूरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. हे शहर दक्षिण भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पिठापूरम हे भारतातील १८ प्रमुख महाशक्ती पिठांपैकी एक आहे. येथे सती देवीच्या शरीराचा भाग पडला होता. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त संप्रदायाचे आद्य अवतार मानले जातात. श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रयांचा कलियुगातील हा पहिला मनुष्य रुपी अवतार मानला जातो. अशा पिठापुरम येथील तीर्थस्थान असलेल्या रक्षाबंधनच्या उत्सवासाठी गोदी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कुटुंबियांनी २४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिशय भक्तीमय वातावरणात प्रवास केला. या प्रवासात नेहमीप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी सर्वश्री उमाकांत थळकर, प्रकाश परब, मारुती विश्वासराव, अमृत तपके, नारायण चिपळूणकर, देविदास खरात, संजय बुतकर, सुवर्णा मयेकर व अदिती मयेकर असे एकूण १४ जणांनी २४ ऑगस्ट २०२६ ला सकाळी विशाखापट्टणम एक्सप्रेस गाडीने लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वे स्टेशनवरून प्रवासाला सुरुवात केली. प्रत्येक कुटुंबातील महिलेने ठरल्यानुसार घरून जेवणाची डबे आणले असल्यामुळे सर्वांनी रेल्वेत घरच्या सुग्रास स्नेह भोजनाचा चांगला आस्वाद घेतला. २५ ऑगस्टला सकाळी पिठापूरम रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर दोन रिक्षा करून आम्ही सुमती नंदन कुटीरला पोहचलो. त्याठिकाणी आयोजनानुसार दोन AC रूम होते. महिलांना एक एसी आणि पुरुषांना एक एसी रूम दिले. रूमवर आल्यानंतर आम्ही सर्वजण आंघोळ करून तयार झालो. त्याच दिवशी सकाळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान मंदिरात श्री दत्तात्रयांचे दर्शन घेतले व मंदिरातील महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री तेथील कॅटरिंगचे मालक श्री. आशिष यांनी आम्हाला घरगुती चांगले जेवण दिले. हेच जीवन आम्ही दररोज रात्री घेतले. २६ ऑगस्टला आम्ही पिठापुरम परिसरातील स्थानिक मंदिरांना भेटी दिल्या. त्याठिकाणी कुंती माधव मंदिर, कुकडेश्वर, अनघा लक्ष्मी, सत्यनारायण मंदिर, स्वामी समर्थ मठ, गोपाल बाबा आश्रम अशा सर्व मंदिरांमध्ये देवदर्शन घेतले. संध्याकाळी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि पिठापूरम दत्त मंदिरातील प्रसिद्ध कार्यकर्ते विलास पाटील, सुनिल पेवेकर, उमाकांत थळकर यांच्या सहकार्यामुळे आम्हाला दत्त मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पालखी सेवेचा अमूल्य लाभ मिळाला. पालखी घेण्याचा हा आयुष्यातील आठवणीत राहणारा क्षण होता.
२७ ऑगस्टला सकाळी दत्तयोग होम केला. दुपारी सुमती नंदन कुटीरचे मालक श्री. दत्ता सर यांच्या घरी जाऊन महाप्रसाद आस्वाद घेतला. रात्री आयोजक व आमचे सहकारी मित्र श्री. उमाकांत थळकर यांचा सपत्नीक शाल, टोपी, भेटवस्तू देऊन आणि केक कापून वाढदिवस साजरा केला. २८ ऑगस्टला रक्षाबंधनानिमित्त पिठापुरममध्ये मोठा उत्सव असतो. मंदिरात खूप गर्दी असते. या यात्रेचा सर्वांनी आनंद घेतला. आमच्या सोबत असलेल्या बहिणीनी भावांना राखी बांधून भेटवस्तू दिल्या. आम्ही त्यांना भाऊ म्हणून ओवाळणी दिली. रक्षाबंधन कार्यक्रमाच्या दिवशी देवाला राख्या बांधल्या. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरात दर्शन घेऊन संध्याकाळी आजोळकडे महाप्रसाद घेतला. २९ ऑगस्टला सामलकोट व काकीनाडाकडे प्रस्थान करून
आठव्या शतकातील भिमेश्वर मंदिर, १२ व्या शतकातील लक्ष्मी गणपती मंदिर, , बारावे शक्तीपीठ, रामालय, साईबाबा मंदिर, श्री भवननारायण मंदिर, बालाजी तिरुपती मंदिर अशा प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेतले. दुपारी काकीनाडाचे "सुब्बय्या हॉटेल" हे तेथील पारंपारिक आंध्र शाकाहारी भोजनासाठी जगप्रसिद्ध आहे. तेथील रुचकर जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. साडी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपाडा येथे जाऊन सर्व महिलांनी खरेदीचा लाभ घेतला. संध्याकाळी नेहमीप्रमाणे घरगुती जेवण घेतले. नियोजनानुसार रात्री पिठापूरम रेल्वे स्टेशनकडून परतीचा प्रवास सुरू केला. रेल्वेमध्ये आयोजक उमाकांत थळकर आणि प्रकाश परब यांच्या विशेष प्रयत्नामुळे सिकंदराबाद आणि सोलापूर येथे सर्वांना घरगुती जेवणाची उत्तम सोय झाली. त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्वांचा प्रवास सुखकर होऊन चांगले देवदर्शन झाले. पिठापुरमच्या या धार्मिक यात्रेत मुंबई पोर्ट ट्रस्टचे जवळजवळ ५० कर्मचारी कुटुंबासहित सहभागी झाले होते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक मोठ्या संख्येने येतात. आमच्या या प्रवासात मात्र आमचे नेहमीचे सहकारी मित्र श्री. जे. पी. मुजावर यांची आठवण मात्र प्रकर्षाने सर्वांना जाणवत होती. आमचे पिठापुरममधील देवदर्शन आणि भक्तिमय वातावरणातील प्रवास सुखाचा झाला.

COMMENTS