पॅरा योगासन स्पोर्ट्स कमिटी आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या मान्यतेने योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी यांच्यावतीने जिल्हास्तर...
पॅरा योगासन स्पोर्ट्स कमिटी आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या मान्यतेने योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी यांच्यावतीने जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे आयोजित केली होती.
या स्पर्धेत वत्सल विठाई अस्थिव्यंग निवासी विद्यालय गंगाखेड या शाळेच्या योगासन पटूंनी उत्कृष्ट योगासन प्रात्यक्षिक सादर करून संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पॅरा योगासन क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले.
ऑर्थोपेडिकल अपंग वीस वर्षाखालील मुलांच्या गटात करण वैजनाथ पवार ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेत सुवर्णपदक, अनिल गुणाजी चिबडे रजत पदक आणि सम्यक रवी ढवळे कांस्यपदक,
ऑर्थोपेडिकल अपंग मुलींच्या गटात हर्षदा गोपीनाथ निरपणे सुवर्णपदक, संगीता जीवराज मुंढे रजत पदक, रमा अशोक घाटके कांस्यपदक पटकावले.
समारोपीय कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले यांनी पदक घालून सर्व खेळाडूंचा सत्कार केला आणि खेळाडूंना राज्यस्तरीय पॅरा योगासन क्रीडा स्पर्धा संभाजीनगर साठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्य खो-खो मार्गदर्शक संजय मुंडे क्रीडा अधिकारी औंढेकर, योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव देविदास सोन्नेकर, क्रीडा कार्यालयातील श्री पंडित, मार्गदर्शिका सुरेखा पवार, फिजीओ थेरपीस्ट सागर उप्पूवार, सगुना केंद्रे आणि पंच म्हणून माधव देशपांडे, सोमनाथ महाजन कृष्णा होलिया उपस्थित होते.

COMMENTS