शटलकॉक विश्वचषक स्पर्धा ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान हाँगकाँग येथील टुन तुसेन क्रीडा केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती देताना, संघाचे ...
शटलकॉक विश्वचषक स्पर्धा ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान हाँगकाँग येथील टुन तुसेन क्रीडा केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती देताना, संघाचे प्रशिक्षक आणि भारतीय शटलकॉक संघटनेचे महासचिव सुदेश कुमार यांनी सांगितले की, भारतीय संघात महिलांच्या गटात किरण पवार, रिया मॅगिनकेरी आणि नम्रता कांबळे, तर पुरुषांच्या गटात शिवतेज अशोक कदम, शुभम हनुमंत प्रसाद यादव, जिशान शेख आणि अंश अशोक तिवारी यांचा समावेश आहे. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय सैनी, महिला सेल सदस्य आणि जाहिरात संचालक कॅरेन कोर, हरियाणाचे अध्यक्ष राजीव कुमार मित्तल, महाराष्ट्र शटलकॉक असोसिएशनचे सचिव रविकुमार बकवाड, महाराष्ट्र शटलकॉक असोसिएशनचे प्रवीणकुमार कुपटीकर, डॉ. विनय मून ,गणेश माळवे,वैभव शिंदे, ऋषिकेश गावडे आणि मनोज बनकर आकांक्षा फाउंडेशनचे क्रीडा विभागप्रमुख आदरणीय श्री. सुभाष घोडके सर यांनी संघाला हार्दिक शुभेच्छा देऊन उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. हाँगकाँग विश्वचषक चॅम्पियनशिप आकांक्षा फाउंडेशनद्वारे प्रायोजित केले आहे.वरील निवड झालेल्या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS