यशवंत ' मध्ये रसायनशास्त्र विभागात ‘क्युरी क्लब’चे थाटात उद्घाटन*

नांदेड :(दि. १३ सप्टेंबर २०२६) यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सं...
नांदेड :(दि. १३ सप्टेंबर २०२६)
यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, नवोपक्रमशीलता आणि रसायनशास्त्र विषयाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘क्युरी क्लब’ या अभिनव विद्यार्थी-केंद्रित उपक्रमाचे तसेच क्युरी क्लब भित्तीपत्रकाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यशवंत महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी तथा बेंगळुरूस्थित सिंगेने इंटरनॅशनल लिमिटेड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाधारित कंपनीतील प्रिन्सिपल सायंटिस्ट डॉ. राहुल जगताप उपस्थित होते.
डॉ. राहुल जगताप यांना जपानमधील प्रतिष्ठित JSPS (Japan Society for the Promotion of Science) Fellowship प्राप्त झाली असून, त्यांच्या उत्कृष्ट संशोधनकार्याची दखल घेत संपूर्ण भारतातून निवड झालेल्या उत्कृष्ट पीएच.डी. प्रबंधांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून प्रथम पारितोषिकाचा बहुमान प्राप्त झाला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी क्युरी क्लबच्या या अभिनव आणि स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवोपक्रम, प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यातून महाविद्यालयाच्या लौकिकात निश्चितच भर पडते, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकातून क्युरी क्लबचे समन्वयक डॉ. निलेश चव्हाण यांनी, क्लबची संकल्पना, उद्दिष्टे आणि वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, वैज्ञानिक जिज्ञासा वाढविणे, प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणे तसेच विद्यार्थ्यांना संशोधनाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे हा क्युरी क्लबचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. राहुल जगताप यांनी, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयामध्ये उपलब्ध केलेल्या आधुनिक संशोधन सुविधांबद्दल प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे अभिनंदन केले. आपल्या मनोगतात त्यांनी “यशवंत महाविद्यालयामुळेच माझी जडणघडण झाली. येथील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, शिक्षणाची समृद्ध परंपरा आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामुळेच मला संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली,” असे गौरवोद्गार काढले. महाविद्यालयाने दिलेल्या संस्कार व संधींबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना संशोधनाच्या क्षेत्रातील विविध संधी, आधुनिक रसायनशास्त्रातील प्रगत संशोधन, औद्योगिक क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्यांविषयी डॉ. जगताप यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशवंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश वडजे आणि प्रदीप खरबे यांची शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल रसायनशास्त्र विभागप्रमुखांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. ए. बसीर, डॉ. एस. पी. वर्ताळे, डॉ. सुभाष जुन्ने, डॉ. विजय भोसले, डॉ. शिवराज शिरसाट, डॉ. संदीप खानसोळे, डॉ. कविता केंद्रे, क्युरी क्लबचे सदस्य डॉ. मदन आंभोरे, डॉ. दत्ता कवळे, डॉ. ए. एस. कुवर, श्री. एस. बी. राऊत, श्री. शांतुलाल मावसकर श्री. एस. डी. पाटील, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु.अनन्या कुलकर्णी हिने केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. दत्ता कवळे यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला संशोधनाची दिशा देणारा, नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि भविष्यातील संशोधक घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा ‘क्युरी क्लब’ हा उपक्रम यशवंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील निश्चितच एक उल्लेखनीय आणि प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group