रेल्वे कमिटीच्या बैठकीपूर्वी शिवसैनिकांना नोटिसा; शिंदे गट आणि मिंधे सरकारच्या इशाऱ्यावर 'खाकी'ची मुस्कटदाबी शिवसैनिकांचा आरोप नांद...
रेल्वे कमिटीच्या बैठकीपूर्वी शिवसैनिकांना नोटिसा; शिंदे गट आणि मिंधे सरकारच्या इशाऱ्यावर 'खाकी'ची मुस्कटदाबी शिवसैनिकांचा आरोप
नांदेड: महाराष्ट्रात गद्दारी करून सत्तेवर बसलेल्या मिंधे गटाची आणि त्यांच्या पाठीराख्यांची निष्ठावान शिवसैनिकांसमोर कशी पाचावर धारण बसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा नांदेडमध्ये आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांनी गद्दारी केल्यानंतर नांदेड रेल्वे डिव्हिजनमध्ये पहिल्यांदाच गद्दार खासदारांची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसैनिकांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागेल, या भीतीने नांदेड पोलिसांनी सत्ताधारी शिंदे गटाच्या दबावाखाली येत निष्ठावान शिवसैनिकांना नोटिसा बजावल्या आहेत.
पोलिस ठाण्यात बोलावून शिवसैनिकांचे मनोधैर्य खचवण्याचा केविलवाणा प्रयत्नगद्दार खासदार आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नांदेड जिल्ह्यात जनतेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आहे. या जनक्रोशाचा धसका घेऊन पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांनी शिवसेनेचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, नवज्योतसिंग गाडीवाले आणि युवा सेनेचे सचिन पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या विशिष्ट भाषेत नोटिसा बजावून सोडले. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमधून निष्ठावान शिवसैनिकांना विनाकारण त्रास देऊन त्यांचे मनोधैर्य खचवण्याचा हा एकतर्फी प्रयत्न सरकारधार्जिण्या पोलिसांकडून सुरू आहे.
जनता गद्दारांना त्यांची जागा दाखवेल: निष्ठावंतांचा एल्गार प्रकाश मारावार
पोलिसांच्या या दडपशाहीला आणि स्थानबद्धतेच्या कारवाईला न जुमानता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मिंधे सरकारला ठणकावून सांगितले आहे की, "पोलिसांचा कितीही गैरवापर केला, तरी निष्ठावंतांचा आवाज दाबता येणार नाही. सत्ताधारी शिंदे गट पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसैनिकांची मुस्कटदाबी करत आहे. पण, येणाऱ्या काळात जनताच या गद्दार खासदारांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही."
रेल्वे बैठकीच्या निमित्ताने आलेल्या गद्दारांना वाचवण्यासाठी नांदेड पोलिसांनी जी कायदा-सुव्यवस्थेची ढाल पुढे केली आहे, त्यावरून गद्दारांच्या मनात शिवसैनिकांची किती दहशत आहे, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे,

COMMENTS