ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्यांचे जीवनदाते न्यू मिलेनियम हॉस्पिटलचे डॉ. व्यंकटेश हंचाटे

नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...

नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्योजक आहेत. ऑर्थोपेडिक्स आणि ट्रॉमा केअरमध्ये दोन दशकांहून अधिक समर्पित सेवेसह, त्यांनी स्वत: ला  सर्वात विश्वासार्ह वैद्यकीय व्यावसायिकांपैकी एक म्हणून स्थापित केले आहे. असे स्पष्ट उद्गार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काढले. 

सानपाडा येथे न्यू मिलेनियम हॉस्पिटलचे संचालक डॉ.  व्यंकटेश माधवराव हंचाटे यांचा ४ जुलै २०२६ रोजी ५१ वा वाढदिवस साजरा झाला.  याप्रसंगी न्यू मिलेनियम हॉस्पिटलचा डोळे तपासणी विभाग आणि लॅबचे उद्घाटन डॉ. व्यंकटेश  हंचाटे,  वडील डॉ. माधवराव हंचाटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, नाट्यकलाकार व चित्रपट अभिनेते राम काजरोलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सानपाडा व जुईनगर येथील ज्येष्ठ नागरिकांना वाढदिवसानिमित्त छत्री वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला वरिष्ठ गायनिक डॉ.  वैशाली हंचाटे, सीईओ डॉ. ममता  पानिग्रही, सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, संघाचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल  गव्हाणे, माजी खजिनदार विष्णुदास मुखेकर, जुईनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भरत कवडे, सानपाडा हास्य क्लब योगा ६.३० ग्रुपचे योग शिक्षक भरत खरात, कुंभार, ज्येष्ठ नागरिक गार्डन ग्रुप ७.०५ चे गणपत जाधव, डॉ.  हंचाटे यांचे पीआरओ प्रशांत पवार, डॉक्टर,  नर्सेस, पुरुष व महिला पेशंट्स  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

न्यू मिलेनियम हॉस्पिटल ग्रुपचे संस्थापक आणि संचालक म्हणून, डॉ. हंचाटे  यांनी हजारो रूग्णांना व जेष्ठ नागरिकांना  सर्वसमावेशक आणि परवडणारी आरोग्य सेवा देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  नवी मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात. त्याचे कौशल्य ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, संयुक्त बदली, आघात व्यवस्थापन आणि मणक्याची काळजी घेणे इत्यादी आजारावर ते लोकप्रिय आहेत. ऑर्थोपेडिक आणि ट्रॉमा केअरमध्ये त्यांचा २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. २००४  मध्ये नवी मुंबईतील सानपाडा येथे १५  खाटांचे रुग्णालय म्हणून न्यू मिलेनियम हॉस्पिटलची स्थापना केली. २०१४ मध्ये ३०  खाटांच्या एनएबीएच-मान्यताप्राप्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये संस्थेचा विस्तार केला, आता प्रगत आयसीयू सुविधा आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरसह  २४ तास सुसज्ज  रुग्णालय  आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group