वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी विधानपरिषदेत मागणी करणार आमदार अमरभाऊ राजूरकर

नांदेड:राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या 'वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ' तातडीने कार्...

नांदेड:राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या 'वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ' तातडीने कार्यान्वित करावे, या मुख्य मागणीसाठी नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त आमदार अमरभाऊ राजूरकर यांची आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी राज्य वृत्तपत्र विक्रेता कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. 

      अमरभाऊ राजूरकर हे सलग तिसऱ्यांदा विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल (हॅटट्रिक) यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी आठवण करून दिली की की, "आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरभाऊंनी विशेष लक्ष घालून तत्कालीन महापौर सौ मोहिनी विजय येवणकर नांदेडमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 'सेंटर शेड'ची महत्त्वाची मागणी पूर्ण केली होती. आता राज्यातील लाखो वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा 'कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करण्याचा' प्रश्न आगामी विधानपरिषद अधिवेशनात उपस्थित करून सरकारकडे आग्रही मागणी करावी." अशी विनंती बालाजी पवार यांनी केली. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी विजय येवणकर, माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे, जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घाटोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिष्टमंडळाची मागणी आणि भावना जाणून घेतल्यानंतर आमदार अमरभाऊ राजूरकर म्हणाले की, "हा प्रश्न माझ्या पूर्णपणे माहितीचा असून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी आणि विक्रेत्यांच्या इतर सर्व न्याय्य हक्कांसाठी मी शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा करेन आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न राहतील."

यावेळी नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, सचिव गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार, सदस्य सत्यनारायण देवरकोंडा, अनिल मेडेवार, संजय गोणे, गणेश राऊतराव, विजय कठारे, साईनाथ पस्सलवाड, शंकर जोशी,गंगाधर सदावर्ते आणि साईनाथ हंगरगे यांच्यासह जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group