पुणे/ प्रतिनिधी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीस सातशे पन्नास वर्षे व संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनास तीनशे पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने राज्यस्तरीय पसायदान हरिपाठ रसग्रहण व संत तुकाराम महाराज अभंगवाणी याविषयी रसग्रहण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्रातील अडीच हजाराहुन संत साहित्य अभ्यासक किर्तनकार प्रबोधनकार प्रवचनकार बुवांनी संत साहित्यिकांनी रसग्रहणात्मक लेखन करून सहभाग नोंदवला होता यामध्ये किशन दत्तात्रय उगले शेकापूरकर यांचे रसग्रहणात्मक लेखन अतिशय मार्मिक भाष्य करणारे ठरले त्यांच्या पसायदान व हरिपाठ आणि संत तुकाराम महाराज अभंगवाणी वरील रसग्रहणात्मक लेखनाने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याबद्दल किशन उगले यांचा आषाढी एकादशी सोहळ्याच्या दिवशी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे प्रतिष्ठानच्या वतीने रोख रक्कम शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन जाहीर सत्कार व पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेअसे प्रतिष्ठानचे अध्यक्ष थोर विचारवंत साहित्यिक किर्तनकार प्रवचनकार सुनील अभ्यंकर महाराज यांनी माहिती दिली
किशन उगले शेकापूरकर यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी साहित्यिक किर्तनकार प्रबोधनकार प्रवचनकार सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे

COMMENTS