बिलोली /प्रतिनिधी आंतर भारती माध्यमिक विद्यालय बिलोली येथील विध्यार्थीनी कु. श्रावणी भाऊसाहेब बनबरे हिने काल जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या...
बिलोली /प्रतिनिधी आंतर भारती माध्यमिक विद्यालय बिलोली येथील विध्यार्थीनी कु. श्रावणी भाऊसाहेब बनबरे हिने काल जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९५. ६० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
श्रावणी हिने हॆ यश मिळवून शाळेतून सर्वप्रथम तर बिलोली तालुक्यातून द्वितीय येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांसह माजी आ. सुभाषराव साबणे, जि. प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अरविंद ठक्करवाड, राजेंद्र रेड्डी तोटावाड, प्रा. शंकर पवार, सरपंच अशोक दगडे,मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर, सुभाष पवार, अमरदीप दगडे, राजेंद्र रुद्रूरकर,तुकाराम शिंदे,राम पवार,श्याम पवार,संजय पवार,बालाजी पसरगे आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS