बिलोली/ प्रतिनिधी बिलोली तालुक्यातील थडी हिप्परगा येथील दिं. ७ मे रोजी येसगी येथिल मांजरा नदीत २३ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू...
बिलोली/ प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील थडी हिप्परगा येथील दिं. ७ मे रोजी येसगी येथिल मांजरा नदीत २३ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.* बिलोली तालुक्यातील हिप्परगा येथिल विवेक शंकर महाजन वय २३, राहणार असून मिळालेल्या माहितीनुसार विवेक हा येसगी मांजरा परिसरातील आपल्या मित्रासोबत उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. मात्र पाण्याची खोलीचा अंदाज न लागल्याने पाण्यात बुडुन मृत्यू पावला आहे. सदरील मयत युवकास तातडीने बिलोली येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, पाण्यात शेवाळ असल्यामुळे पाय घसरून तो खोल पाण्यात गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बिलोलीचे पो. नि. बाळासाहेब रोकडे यांच्या आदेशानुसार सगरोळी बिटचे ए एस आय चंदर आंबेवार यांनी पुढील तपास करीत आहे. विवेक महाजन त्यांच्या मागे आईवडील लहान भाऊ, एक बहीण हा घरचा कर्ता युवक मरण पावल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

COMMENTS