नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

 

आज दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन मा. जिल्हाधिकारी नांदेड श्री. अभिजीत राऊत यांनी केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
इमेज
योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो ; महेबूब भाई आम्ही तुमच्या सोबत आहोत ! - शेख फेरोज
इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*
इमेज