हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध अशा आठ समितीची निर्मिती करण्यात आलेली असून यामध्ये डॉ. आर. जी. चिल्लावार डॉ. बी. बालाजीराव डॉ. एम. एम. व्ही. बेग डॉ. के एम इंगोले डॉ. आर. एल सोनटक्के, प्रा. एस. बी. राऊत, प्रा. प्रियंका सिसोदिया, डॉ. पी. आर मिरकुटे व डॉ. एम. डी. अंभोरे यांचा समावेश आहे. तर डॉ. एल. व्ही. पदमाराणी राव (समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता कक्ष) ह्या वरील समित्यांना समन्वय करतील.या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माझी प्र-कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
अर्थ वीक(22-29 एप्रिल 2026) दरम्यान पर्यावरण जनजागृती, जबाबदार वर्तन व विद्यार्थी सहभाग, विविध सस्तेनेबिलिटी उपक्रम राबविण्यात येणार आहेत
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग नोंदवणे त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाची बांधिलकी निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट असेल
हा उपक्रम विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट गोल्स (SDG 2030) उद्दिष्टांना पूरक आहे. यशवंत महाविद्यालय नांदेड शाश्वत विकास व विद्यार्थी केंद्रित सामाजिक बांधिलकी दर्शवितो

COMMENTS