पेनुर दि 24 .
नांदेड जिल्ह्यामध्ये विद्यार्थी हिताचे उपक्रम तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल पेनुर प्रसिद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणूनआज जिल्हा परिषद हायस्कूल पेनुर तालुका लोहा जिल्हा नांदेड या शाळेमध्ये आनंददायी शाळा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी विद्यार्थ्यांना लाठी काठी, सॉफ्ट बॉल ,बेसबॉल, रब्बी बॉल, ऍथलेटिक्स ,कॅरम ,चेस ,फुटबॉल व्हॉलीबॉल ,बास्केटबॉल ,शटल कॉक, रिंग टेबल टेनिस आदी खेळांचं प्रशिक्षण पण आयोजित करण्यात आलं होतं जवळपास 100 विद्यार्थी या प्रशिक्षणास हजर होते सर्वांनी अतिशय मन लावून आणि उत्साहात हे प्रशिक्षण घेतले. सदरील प्रशिक्षण राष्ट्रीय खेळाडू पंच आणि प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांनी दिले त्यांना मदत राज्यस्तरीय रग्बी खेळाडू ओम साई गंगाधर शिंदे, मोहन नामदेव दुबे, श्रेयस संजय सोनवाडे , क्रीडा शिक्षक मुरली ढगे यांनी केली. येत्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सदरील विद्यार्थी हे सहभागी होणार आहेत त्यासाठी हे सर्व शिबिर पण त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे . तसेच चौथी आणि सातवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपच्या तासिका, ऑनलाइन संगणक वर्ग देखील घेण्यात येत आहेत.यावेळी
पहिली प्रवेशित बालकाचे आणि पालकाचे सत्काराचे आयोजन देखील करण्यात आले होते.
या आनंददायी शाळा उद्घाटनाचे औचित्य साधून याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गंगाराम राऊत सर, माधव पवार सर, शिवाजी मोरे सर, अनुप कंदुलवार सर ,बालाजी केंद्रे सर, रामलिंग नागठाणे सर या सहा शिक्षकांनी येत्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रशालेला 6x4 चे जवळपास 3000 रुपये किमतीचे व्हाईट बोर्ड सप्रेम भेट दिले आहेत त्यांच्या या दातृत्वाचं सर्वजण कौतुक करत आहे याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मदन गवते, उपाध्यक्ष चंद्रकांत एडके , गोवर्धन गवते, पत्रकार वीरभद्र एजगे,सर्व सदस्य तसेच प्रशालेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी व सर्व शिक्षक सहकारी यांनी त्यांच्या या कार्याचं कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. यावेळी मारोती सोने ,सौ.स्नेहल जावळे , सौ.राजनंदा मुरडे,सौ मीना मोतेवार, सौ उज्वला राखेवार, श्रीमती दांडे, सौ वैशाली शिरशीकर, विश्वनाथ लिंबूरकर, श्रीमती सुवर्णा मंडलिक,सौ.मीनाक्षी गोखंडे,सौ. प्रिया कराळे ,नामदेव कोतवाल आदी शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
मा. संपादक साहेब/ मा.जिल्हा प्रतिनिधी साहेब,
कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकातून सदरील चांगल्या शैक्षणिक बातमीस प्रसिद्धीस द्यावी ही
विनंती .
आपला स्नेही
प्रलोभ कुलकर्णी
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद हायस्कूल पेनुर
तालुका लोहा जिल्हा नांदेड.9421819020/8625021219

COMMENTS