गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी 'HPV' लसीकरण मोहीम सुरू; अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

भोकर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस)...

भोकर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि लसीकरण यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

उद्देश: गर्भाशयमुख कर्करोगाचा (Cervical Cancer) धोका टाळण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून, जगभरातील १६० देशांनंतर आता भारत १६१ वा देश म्हणून ही लस देत आहे.
आवाहन: भोकर विधानसभा मतदारसंघाच्या मा. आ. सौ. जयाताई चव्हाण यांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शविला असून, त्यांनी लवकरच या लसीकरणाचे महत्त्व सांगणारा व्हिडिओ संदेश देण्याचे आश्वासन दिले आहे.

अफवांना आळा: सध्या समाजमाध्यमांवर या लसीबाबत दिशाभूल करणारा मजकूर पसरवला जात आहे. नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत आरोग्य विभागाच्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांनी केले आहे.
प्रशासकीय मार्गदर्शन: जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जि.प. सीईओ मेघना गावळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.
यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आरोग्य सुविधांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. या मोहिमेत पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मुलींना सुरक्षित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रीनंदन पांचाळ आणि एकनाथ खानसोळे उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel