नांदेड - सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा. शि...
नांदेड - सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा. शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठीचे निवेदन मराठवाडा शिक्षक संघ नांदेड च्या वतीने देण्यात आले. प्रमुख मागण्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान,अंशता अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा, 10:20:30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा, सर्व सरकारी कर्मचारी/ निवृत्ती वेतनधारक/ कंत्राटी रोजंदारी कर्मचारी यांना सर्व महत्त्वाच्या इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावे त्यासाठी व्यापक स्वास्थ विमा योजना लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा, प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती द्या, सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1981 च्या शासन निर्णयाची पूर्ण स्थापना करा, शिक्षकांचे जीवन उध्वस्त करणारा 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन आदेश बाबत पुन्हा विचार करण्यात यावा, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा. याससह इतर मागण्याची निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष - सूर्यकांत विश्वासराव, जिल्हाध्यक्ष -व्यंकटराव चिलवरवार, शहराध्यक्ष डी बी नाईक, आनंद मोरे, आर पी वाघमारे, बालाजी टीमकीकर, अब्दुल हसीब, अतनूरकर, आनंद सुरसे,राम येडते,बाबाराव घाटे, लक्ष्मण कोंडावार, पंडित पाटील बेळीकर, वाघमारे यांच्यासह अनेक शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS