नांदेड: राज्य शासनाचा नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत निराशाजनक आणि फसवा असल्याची घणाघाती टीका फेस्कॉमचे (उत्त...
नांदेड:
राज्य शासनाचा नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत निराशाजनक आणि फसवा असल्याची घणाघाती टीका फेस्कॉमचे (उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग) अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी केली आहे. शासनाच्या या उपेक्षेमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून, "मागितली होती दोन वेळची रोटी, अन दानात मिळाली गळकी वाटी" अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
📌 'आई-बाबा' लाडके नाहीत का?
डॉ. वैद्य यांनी प्रशासनावर ताशेरे ओढताना म्हटले की, ज्या लोकप्रतिनिधींना, मंत्र्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांना आम्ही जन्म दिला, लहानाचे मोठे केले आणि संस्कार दिले, तेच आज आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना विसरले आहेत. शासनाला 'लाडकी बहीण' आणि इतर घटक आठवतात, पण ज्यांनी समाज घडवला ते 'लाडके आई-बाबा' का आठवत नाहीत? असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
🚩 मागण्यांकडे दुर्लक्ष, केवळ 'पुतना मावशीचे प्रेम'
गेल्या अनेक वर्षांपासून निराधार, शेतमजूर, कष्टकरी आणि विधवा ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली. मात्र, अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी कोणतीही ठोस आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.
• न मागता काय मिळाले? तीर्थयात्रा, चष्मे, काठ्या आणि श्रवणयंत्रे.
• गरज कशाची आहे? दोन वेळच्या अन्नाची आणि सन्मानाने जगण्यासाठी हक्काच्या मानधनाची.
शासनाच्या या भूमिकेला डॉ. वैद्य यांनी 'पुतना मावशीचे प्रेम' असे संबोधले असून, ही ज्येष्ठ नागरिकांची निव्वळ प्रतारणा असल्याचे म्हटले आहे.
'यमसदनी पाठवा, नाहीतर तरतूद करा!'
"ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांना शासन भरपूर देतेय, पण जे उपाशी आहेत त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही," अशी खंत व्यक्त करत डॉ. वैद्य यांनी शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर ज्येष्ठ नागरिकांच्या मतांची आणि त्यांच्या अस्तित्वाची गरज नसेल, तर आम्हाला सरळ 'मृत्यूची परवानगी' द्या, अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.
शेवटचा इशारा:
या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आर्थिक तरतूद करून प्रलंबित प्रश्न सोडवले नाहीत, तर रस्त्यावर उतरून सार्वजनिक व सामूहिक रित्या 'मरणास जवळ' करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही, असा इशारा डॉ. हंसराज वैद्य यांनी दिला आहे.

COMMENTS