नांदेड: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत तामसा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तामसा तांडा शिवारात सुरू असलेल्य...
नांदेड: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत तामसा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तामसा तांडा शिवारात सुरू असलेल्या 'अंदर-बाहर' नावाच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ५ लाख ६३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नक्की प्रकार काय?
पोलीस अधीक्षक अबिनास कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने ९ मार्च २०२६ रोजी तामसा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, तामसा तांडा शिवारात काही लोक जुगार खेळत आणि खेळवत आहेत. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकला.
अशी झाली कारवाई
पोलिसांनी छापा टाकताच जुगार खेळणारे काही इसम पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात पकडले. पकडलेल्या आरोपीचे नाव संजय तुकाराम धुमाळे (वय ४५ वर्षे, रा. हदगाव) असे असून, त्याच्यासह इतर ९ फरार आरोपींविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
घटनास्थळावरून पोलिसांनी खालील मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे:
०९ मोटार सायकली
रोख रक्कम १३,२४० रुपये
जुगाराचे साहित्य
एकूण किंमत: ५,६३,२४० रुपये कारवाई करणारे पथक
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनास कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. हाके (भोकर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर, पोलीस उपनिरीक्षक नरवटे, पोलीस कॉन्स्टेबल बट्टेवार, खान आणि होमगार्ड राठोड यांचा समावेश होता.
या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनास कुमार यांनी तामसा पोलीस पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

COMMENTS