नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४२ कोटी १८ लक्ष रुपयांच्या तुटीचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेच...
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४२ कोटी १८ लक्ष रुपयांच्या तुटीचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एकूण ३१४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुविधांवर सर्वाधिक भर देण्यात आला असून, त्यासाठी ९ कोटी ११ लक्ष रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे.विद्यार्थी विकास आणि रोजगारावर विशेष लक्ष
विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कौशल्य वृद्धीसाठी तिजोरी खुली केली आहे. यामध्ये प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
नवीन विद्यार्थी भवन: १ कोटी रुपये.
कौशल्य विकास व स्पर्धा परीक्षा: २८ लक्ष रुपये.
कमवा व शिका योजना: २० लक्ष रुपये.
सॉफ्ट स्किल व व्यक्तिमत्व विकास: २५ लक्ष रुपये.
खेळाडूंना प्रोत्साहन: उत्कृष्ट खेळाडूंसाठी २० लक्ष रुपयांची पारितोषिके.
कुलगुरू सहाय्यता व विद्यार्थिनी दत्तक योजना: प्रत्येकी १५ लक्ष रुपये.
संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेला बळ
संशोधन कार्याला गती देण्यासाठी विद्यापीठाने भरीव निधी राखला आहे. महाविद्यालयीन स्तरावरील संशोधन प्रकल्पांसाठी ७५ लक्ष आणि संकुल स्तरावर ३० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागासाठी ३० लक्ष आणि ग्रंथालयातील पुस्तक खरेदीसाठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पायाभूत सुविधांचा विस्तार: उपकेंद्रांना मिळाले महत्त्व
विद्यापीठाच्या विस्तार प्रकल्पांतर्गत उपकेंद्रांच्या विकासासाठी मोठी तरतूद आहे:
परभणी उपकेंद्र: इमारत बांधकामासाठी ५ कोटी रुपये.
लातूर उपकेंद्र: वसतिगृह बांधकामासाठी ५ कोटी रुपये.
हिंगोली न्यू मॉडेल डिग्री कॉलेज: रस्ते व कंपाउंडसाठी ४५ लक्ष रुपये.
परिसर हरितीकारण (उद्यान विभाग): ८८.५० लक्ष रुपये.
"हा अर्थसंकल्प जरी तुटीचा असला, तरी तो पूर्णपणे विद्यार्थीकेंद्रित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. एनआरआयएफ (NIRF) रँकिंगमध्ये स्थान मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज आहे." — डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू
या बैठकीला प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS