किनवट : तालुक्यातील बोधडी बुद्रुक परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर किनवट पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. मोजे बोधडी बुद्रुक येथील...
किनवट : तालुक्यातील बोधडी बुद्रुक परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर किनवट पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. मोजे बोधडी बुद्रुक येथील जगन्नाथ बाबा माळ शिवारात छापा टाकून अंदाजे ६०० लिटर हातभट्टी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे मोहफुल रसायन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ३६ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी उत्तम एकनाथ केंद्रे (रा. बोधडी बु.) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडेवार, पोहेका आत्राम, वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल रांजणे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल डुकरे यांच्या पथकाने केली.

COMMENTS