सानपाडा येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त प्रा. विशाल गरड यांचे शिवव्याख्यान

नवी मुंबई : सानपाडा सामाजिक संस्थेचे प्रमुख सल्लागार श्री. मिलिंद सूर्यराव आणि शिवाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी मिलिंद  सूर्यराव य...

नवी मुंबई : सानपाडा सामाजिक संस्थेचे प्रमुख सल्लागार श्री. मिलिंद सूर्यराव आणि शिवाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी मिलिंद  सूर्यराव यांच्या माध्यमातून ७ मार्च २०२६ रोजी संत गाडगे महाराज खेळाचे मैदान , सेक्टर - ८ , सानपाडा येथे  शिवजयंती उत्सवानिमित्त सुप्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्रा. विशाल गरड  यांचे सानपाडा विभागात पहिल्यांदाच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आतापर्यंत प्रा. विशाल गरड यांचे युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर अनेक व्याख्यान ऐकले होते. मात्र प्रत्यक्षात  सानपाडा येथे  प्रथमच प्रा. विशाल गरड यांचे शिवचरित्रावर आधारीत व्याख्यान झाले. तब्बल दीड ते पावणे दोन तास चाललेल्या या व्याख्यानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमांचकारी इतिहास डोळ्यांसमोर उभा केला.  प्रा. गरड यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंग आणि घटना सांगून त्यातून आजच्या पिढीने काय बोध घेतला पाहिजे, हे स्पष्ट केले छत्रपती शिवरायांची युद्धनीती व कूटनीती, वास्तुकला, शिल्पकला, महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांविषयी व रयतेविषयी असणारी आस्था, संघटन कौशल्य, जलव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण यासारखे विविध तत्त्वे संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत.छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांनी विशद केले. या कार्यक्रमाचा परिसरातील अनेक शिवभक्तांनी लाभ घेतला आयोजकांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा देखील सानपाडा वासियांनी लाभ घेतला. प्रा. विशाल गरड यांची " रायरी " कादंबरी पुस्तक प्रेमींनी जरूर वाचावी . कवी, लेखक, चित्रकार, व्याख्याते तथा बार्शी तालुक्‍याचे सुपुत्र प्रा. विशाल गरड यांचा आवाज शिवव्याख्यानातून सातासमुद्रापार गेला आहे.

आपला 

मारुती विश्वासराव

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel