नांदेड (प्रतिनिधी)
जुन्या नांदेड शहरातील विविध भागातून जाणारे गटाराचे १७ नाले गोदावरी नदीपात्रात जात आहेत त्यामुळे नदीपात्राचे पावित्र्य धोक्यात येत असून नदीपात्रातले घाण पाणी होऊन दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे नदीपात्रात जाणारे १७ नाले तात्काळ बंद करून भंडार पर्यंत जाणारी नवीन पाईपलाईन निकृष्ट दर्जाची टाकल्यामुळे नाल्यातील पाणी नदीत जात असल्यामुळे या सर्व कामाचे कंत्राटदार मे. शारदा कंट्रक्शन मार्फत काम केली जात आहेत त्यामुळे शारदा कंट्रक्शन चे झालेल्या सर्व कामाची चौकशी होईपर्यंत त्यांचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी मा आयुक्त साहेब नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्याकडे सौ नीलमताई तुलजेश यादव शिवसेना नगरसेविका यांनी एका लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
नांदेड शहरातून वाहणारी गोदावरी नदी दक्षिण गंगा म्हणून ही पवित्र नदी मानली जाते त्यामुळे नांदेड शहरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात १७ नाल्याचे गटाचे घाण पाणी गोदावरी नदीत मिसळत असल्यामुळे गोदावरी चे पावित्र्य दूषित होत आहे गोदावरी नदीचे पावित्र्य कायम अबाधित ठेवणे हे समस्त हिंदू समाजाचे व धर्माचा हस्ते चा प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी व नदी दूषित होऊ नये म्हणून नांदेड वाघाळा महानगरपालिकेने गोदावरी नदी त पात्राच्या दोन्ही बाजूने जाणारे १७ नाले तात्काळ बंद करून या नाल्याचे दूषित पाणी बोंढार पर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे परंतु या कामाचे संबंधित गुत्तेदार यांनी पाईपलाईनचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन टाकून ते काम करत आहेत त्यामुळे संबंधित मे शारदा कंट्रक्शन यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व त्या कंट्रक्शन चे बिल चौकशी होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सौ नीलमताई तुलजेश यादव यांनी केली आहे.
17 नाल्यातील घाण पाणी गोदावरी नदी त दोन्ही बाजूने परवावित होत आहे त्यामुळे हिंदू समाज बांधवांचे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत त्यामुळे मा आयुक्त साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष देऊन संबंधित कंट्रक्शन चे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे त्यांनी त्या कामावर जाऊन तात्काळ पाहणे करून चौकशीचे आदेश द्यावेत चौकशी होईपर्यंत बिल देण्यात येऊ नये असेही म्हटले आहे या निवेदनाच्या प्रती मा. ना श्री एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आ. पाटील बोढारकर मा. श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड सौ कविताताई मुळे महापौर नांदेड मा श्री दीपक सिंग रावत उपमहापौर नांदेड यांना निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत दिलेल्या निवेदनावर सौ नीलमताई तुलजेश यादव शिवसेना नगरसेविका यांची स्वाक्षरी आहे

COMMENTS