मुस्लिम समाजाच्या पवित्र महिना म्हणून समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात शहरात सार्वजनिक शांतता अपाधित राहावे वाहतूक कोंडी टाळावे आणि धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाय योजना कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख नांदेड दक्षिण तुलजेश यादव यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की रमजान हा उपवास प्रार्थना आणि ईश्वराची आराधना करण्याचा पवित्र काळ असला तरी काही ठिकाणी या काळात सुव्यवस्था निर्माण होत असल्याचे चित्र जुन्या नांदेड शहरात दिसून येत आहे रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी तरुण रस्त्यावर क्रिकेट शटर कॉक खेळत मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत आहेत व त्या ठिकाणी टवाळखोर तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र गोळा होत असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे जुन्या नांदेड परिसरातील कष्टकरी नागरिक वृद्ध व आजारी व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे सार्वजनिक रस्त्यावर क्रिकेट व शटर कॉक खेळत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार तुलजेश यादव शिवसेना शहरप्रमुख नांदेड दक्षिण यांनी जिल्हाधिकारी साहेब नांदेड व पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच जुनागंज ते हबीब टॉकीज या मुख्य मार्गावर रमजानकाळात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बाजारपेठ उभी राहत असल्यामुळे या भागात वाहतूक मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे त्या वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचेही यादव यांनी नमूद केले आहे या गर्दीमुळे रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील वाहनानाही मार्ग मिळत नसल्याची बाब यादव यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे गेल्या काही वर्षात या गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटकाकडून वाद निर्माण होण्याचे प्रकार अनेकदा घडत आहेत परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी व कायदा सुव्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे रात्री रस्त्यावर क्रिकेट शटर कॉक व गोंधळ घालणाऱ्या दंड अत्मक कठोर कारवाई करावी जुनागंज ते हबीब टाकीज मार्गावरील बाजारपेठ नियम बंद करावी किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच सर्व धर्मीय नागरिकांना शांततेत राहण्याचे वातावरण निर्माण करावे असे मागणी तुलजेश यादव शिवसेना शहरप्रमुख नांदेड दक्षिण यांनी केली आहे.

COMMENTS