श्रीरामपूर ( प्रतिनिधी): जागतिक व्हॉलीबॉल संघटना (FIVB) व व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ५ मार्च २०२६ दरम्यान सवयी मानसिंग स्टेडियम,जयपूर, राजस्थान येथे लेव्हल-१ व्हॉलीबॉल प्रशिक्षक कोर्स आयोजित करण्यात आला होता. या कोर्सचे आयोजन राजस्थान व्हॉलीबॉल संघटना यांनी केले होते.
या प्रतिष्ठित कोर्ससाठी देशभरातून १५० पेक्षा अधिक प्रशिक्षकांनी अर्ज केले होते. त्यापैकी कठोर निवड प्रक्रियेनंतर ४५ प्रशिक्षकांची निवड करण्यात आली. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातून केवळ २ प्रशिक्षकांचीच निवड या कोर्ससाठी झाली होती. त्यामध्ये श्रीरामपूरचे गौरव अरविंद डेंगळे यांचा समावेश होता.
या कोर्समध्ये FIVB चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जी इ श्रीधरण यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक व्हॉलीबॉल प्रशिक्षण पद्धती,खेळाडूंचा शारीरिक व तांत्रिक विकास,सराव नियोजन, खेळातील नवीन तंत्रज्ञान तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
गौरव अरविंद डेंगळे हे सोमैया विद्या विहार अंतर्गत चालणाऱ्या श्री शारदा इंग्लिश सोमैया स्कूल,कोपरगाव येथे कार्यरत असून ते गेली २२ वर्षे व्हॉलीबॉल प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉलचे प्रशिक्षण देऊन खेळाडू घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करत आहेत.
हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे समीर सोमैया (अध्यक्ष, सोमैया ट्रस्ट),पार्थ दोशी (मुख्य कार्यकारी अधिकारी,SGFI),सुहास गाडगे साहेब, प्राचार्य के एल वाकचौरे,माजी मुख्याध्यापिका सौ क दोशी,
ओम महाले, राजेंद्र कोहाकडे, मनोज म्हस्के, सचिन गुलाटी, स्वामीराज कुलथे, हरिंदर बत्रा, नितीन बलराज, निरज त्रिपाठी,आशिष गरुड तसेच व्हॉलीबॉल खेळाडूंनी सत्कार करून अभिनंदन केले.तसेच महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर व व्हॉलीबॉलप्रेमींनीही त्यांचे कौतुक केले.या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व्हॉलीबॉलचा विकास करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करणार असल्याचे गौरव डेंगळे यांनी सांगितले.

COMMENTS