कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसुंधरेचे', 'चित्रांची गोष्ट', 'निसर्ग संवेदन' आणि 'उदमांजर' अशी पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आता ती 'शब्दगंध' हे आपले सहावे पुस्तक घेऊन मराठी वाचकांच्या भेटीला आली आहे. 'शब्दगंध' ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी लेखिका समृद्धी केरकर हिच्याविषयी लिहिले पाहिजे. त्याशिवाय तिचे वेगळेपण आणि तिच्या लेखनाची उंची लक्षात येणार नाही.
समृद्धीच्या आई प्रा. पौर्णिमा केरकर ह्या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या भाष्यकार आहेत. समृद्धीचे वडील प्रा. राजेंद्र केरकर हे पर्यावरणवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आहेत. केरकर दांपत्याचा औपचारिक शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षणावर विश्वास असल्यामुळे त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलीला (समृद्धी) कोणत्याही शाळेत प्रवेश दिला नाही. चार भिंतींच्या, कोणत्याही शाळेच्या, बंदिस्त वर्गखोलीत औपचारिक शिक्षण दिले नाही. निसर्गाच्या, बिनभिंतीच्या समृद्ध शाळेत समृद्धीचे अनौपचारिक शिक्षण झाले आहे. समृद्धीने जशी विपुल पुस्तके वाचली आहेत, तसेच मनस्वीपणे निसर्गवाचन केले आहे. समृद्धीच्या आईवडलांनी तिची वाचनाची अभिरुची जपली, जोपासली. जिज्ञासूपणे प्रश्न विचारत आणि उत्तरांचा शोध घेत समृद्धी ज्ञानवंत झाली आहे. शाळा नाही, परीक्षा नाही, स्पर्धा नाही, त्यामुळे तिच्याकडे कोणतीही कागदावरची पदवी नाही. त्यामुळे काही बिघडले नाही. कौटुंबिक वातावरणात आणि निसर्गाच्या सहवासात आनंददायी शिक्षण घेत समृद्धीचे जीवन ख-या अर्थाने समृद्ध झाले आहे.
चित्रकला, संगीत, भ्रमंती, वाचन आणि लेखन ह्या विषयांत समृद्धीला विशेष आवड आणि गती आहे. 'शब्दगंध' ह्या आपल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि सजावटही समृद्धीनेच केली आहे. 'शब्दगंध' म्हणजे समृद्धीने वाचलेल्या इंग्रजी पुस्तकांविषयी लिहिलेल्या ३३ लेखांचा संग्रह आहे. हे सगळे लेख 'गोवन वार्ता' ह्या गोव्यातील नामांकित दैनिकात प्रकाशित झाले आहेत. आपल्या समाजातील वाचनसंस्कृती आटत चाललेल्या कालखंडात समृद्धीने केलेले वाचन अफाटच आहे. समृद्धीने आपल्या वयाच्या सतराव्या-अठराव्या वर्षांत लिहिलेले हे लेख, इंग्रजी पुस्तकांचे वाचन नसलेल्या वाचकांना समृद्ध करणारे आहेत. 'शब्दगंध' हे पुस्तक म्हणजे त्या पुस्तकांची समीक्षा नव्हे. हे त्या पुस्तकांचे आकलन आहे आणि आस्वाद आहे. आपल्या मनोगतात लेखिकेने म्हटले आहे की, हे केवळ लेख नसून, माझ्यासाठी माझ्या काही सुंदर अनुभवांची साठवण आहे.
विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' ह्या कवितासंग्रहाबद्दल समृद्धी लिहिते, की पिता, पत्नी व मुलीच्या पाठोपाठ झालेल्या मृत्यूमुळे ओसाड झालेल्या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक अशा कालावधीत टागोरांनी लिहिलेल्या या कविता आहेत. आपल्या आयुष्यात कितीही दु:खं आली, विरह झाला, तरी त्यात खचून न जाता, दु:खाचेच एक बियाणे करून त्यांनी ही गीतांजलीसारखी काव्यफुलं फुलवली. ह्या कवितारूपी प्रार्थना आहेत, असे मत समृद्धीने नोंदविले आहे.
ॲन फ्रॅंकच्या डायरीबद्दल समृद्धी लिहिते, ही डायरी वाचत असताना मी जणू स्वतःला वाचत असल्याचा आभास होत होता. स्वतःच्या आयुष्यातील काळोख्या रात्री तिने शोधलेले प्रकाशाचे किरण बनून ती अनेकांना त्यांच्या निराशेत एक आधार देत आहे. ही डायरी ॲनच्या काळातील एक धगधगते वर्तमान आहे, असे समृद्धीला वाटते. ही डायरी स्वतःची स्वतःशी भेट घडवते, हा समृद्धीचा अभिप्राय अतिशय बोलका आहे.
पॉल सुधीर अरुल कलानिधी ह्या न्यूरोसर्जनला वयाच्या अवघ्या छत्तिसाव्या वर्षी कॅन्सरने गाठले. ते आपल्या आत्मकथनात लिहितात, आपल्याला श्वास घेण्यासाठी फुफ्फुसे आहेत आणि डोंगर चढण्यासाठी पाय आहेत, आणि एवढं पुरेसं असतं, ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, ही शरमेची बाब आहे. जरी मी आता मरेन अशा अवस्थेत असलो, तरीही प्रत्यक्ष मरण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत मी जगेन. पॉलचा हा दुर्दम्य आशावाद अतिशय महत्त्वाचा आहे. यावर भाष्य करताना समृद्धी लिहिते, की जिवंत असणे आणि जीवन जगणे यात फरक असतो. अखेर २००५मध्ये अकाली निधन झाल्यामुळे पॉलचे 'व्हेन ब्रीद बिकम्स एअर' हे आत्मकथन अपूर्ण राहून गेले. त्यांची पत्नी ल्युसी हिने ते पूर्ण केले. ते वाचून समृद्धी लिहिते, की हे पुस्तक आपल्याला प्रत्येक दिवशीच्या सामान्य गोष्टीत आनंद शोधायला शिकविते. समृद्धीला वाटते, की अशी पुस्तके आयुष्यात एक दीपस्तंभ बनून अनेकांना तेजोमय वाट दाखवण्याचे काम करतात.
सुधा मूर्ती ह्या आवडत्या लेखिका असल्यामुळे समृद्धीने त्यांची अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यांची 'महाश्वेता' ही कादंबरी वाचून समृद्धी अतिशय प्रभावित झाली होती. ती म्हणते, आजही जगात अशा अनेक महाश्वेता असतील, ज्या आपण कधीही न केलेल्या गुन्ह्याची विनाकारण शिक्षा भोगत असतील. अशांना बळ देण्यासाठी हे पुस्तक फारच प्रेरणादायी ठरू शकते, असे समृद्धीला वाटते. महाश्वेताची सारी सुखदुःखं, आनंद आणि शेवटी तिला मिळालेलं यश त्या वेळेपुरतं माझं होऊन गेलं. कादंबरीतील नायिकेच्या सुखदु:खाशी समरस होणारी समृद्धी किती संवेदनशील आहे, याची प्रचिती येते.
आयेशा चौधरी ह्या १७ वर्षीय मुलीला पल्मोनरी फायब्रोसिस नावाचा फुप्फुसांचा जीवघेणा आजार झाला होता. तिने 'माय लिटल एपिफनीज' हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यावर समृद्धी लिहिते : 'अशा पुस्तकांमुळे मला मी घेत असलेल्या माझ्या प्रत्येक श्वासाच्या मूल्याची जाणीव होत राहते. एखाद्याचा विचार पटला नाही, तर आपण आपल्या दोन मनांमध्ये भिंत उभारतो. त्या मनाच्या भिंतीला जर एखादी खिडकी असती, तर किती चांगलं झालं असतं! नुसते एकमेकांच्या चेह-यावर न भाळता, प्रत्येक जण कोणकोणत्या कसोट्यांशी सामना करत कशाकशाला तोंड देतो आहे, हे जाणून आपण एकमेकांसाठी सहानुभूती किंवा मदतीचा हात पुढे केला असता.
मनाची भिंत आणि मनाची खिडकी ही समृद्धीची कल्पना कौतुकास्पद आहे.
ह्या लेखाचा समारोप करताना समृद्धी लिहिते, जगण्यासाठी आपल्याजवळ खूप काही असतं, तरीही आपण दु:खी असतो. तक्रार करत राहतो. पण जगण्यासाठी ज्यांच्याजवळ खूप कमी आयुष्य आहे व जे आहे तेही यातनांनी भरलेलं आहे, त्यांनी काय करावं? असा प्रश्न समृद्धीने उपस्थित केला आहे.
समृद्धी जेव्हा एखादे पुस्तक वाचते, तेव्हा ती त्या पुस्तकात हरवून जाते. ती पुस्तके जिवंत होऊन तिच्याशी बोलू लागतात. पुस्तकातील काही गोष्टी ती आपल्या जगण्याशी जुळवून पाहू लागते. जणू आपला विवेकच आपल्याशी संवाद साधतोय, असे तिला वाटते. रॉबिन शर्मा यांचे 'हू विल क्राय व्हेन यू डाय?' हे पुस्तक वाचत असताना समृद्धीला असाच प्रेरणादायी अनुभव आला. उजाडणारा प्रत्येक दिवस म्हणजे आपल्याला लाभलेला एक आशीर्वाद समजून तो आयुष्याशी नेहमी ऋणी राहून ते जमेल तेवढ्या आनंदाने जगायचा. मृत्यू ही आयुष्यातील शोकांतिका नसून आपण जीवन जगत असताना पावलोपावली मरत असतो, हीच खरी जीवनातील शोकांतिका आहे, असे समृद्धीला वाटते.
सुधा मूर्ती यांची 'जेन्टली फॉल्स द बकुळा' ही कादंबरी वाचल्यावर समृद्धीची विचारप्रक्रिया गतिमान होते. ती म्हणते, वेळ म्हणजे नक्की काय हे माहीत नाही, पण एक अशी गोष्ट, जिला आपण कधीच पकडून ठेवू शकत नाही आणि तिचा अंदाजही लावू शकत नाही. म्हणून ती नेहमी मोकाट धावत असते आणि आपल्यासोबत अनेक गोष्टी घेऊन जाते. ह्या कादंबरीत नात्यात येणारा दुरावा, हळूहळू करत शेवटी अचानक झडप घालणारे नैराश्य, सुख, दु:ख, संघर्ष, भावना, प्रेम हे सगळे काही त्यात बारकाईने मांडले आहे. तिची कथा फक्त श्रीकांत-श्रीमती यांच्यापुरती मर्यादित नसून यश आणि प्रतिष्ठेमागे सतत धावणाऱ्या आपल्या प्रत्येकाचीच आहे. या सगळ्या जंजाळात आपण खरंखुरं जगणं आणि संवेदनशीलता विसरून जात आहोत, याची प्रचिती ही कहाणी आपल्याला करून देते, असे समृद्धीला वाटते.
चांगली पुस्तकं लवकर वाचून संपली, की समृद्धीला एखादा जिवलग सोबती गमावल्यासारखं वाटतं. 'बॉक्स ऑफ हॅप्पीनेस' हा रस्किन बॉंड यांच्या तीन पुस्तकांचा संच वाचल्यावर समृद्धीची हीच भावना झाली होती. हॅप्पीेनेस (आनंद), लव्ह ॲंड कंपेनियनशिप (प्रेम आणि मैत्री), सेरेनिटी (प्रसन्नता) ह्या पुस्तकांतील छोटे छोटे विचार, कवितेच्या ओळी आणि अर्थपूर्ण वाक्ये म्हणजे आनंदाचा खजिना आहे, असे समृद्धीला वाटते. आनंदाला शोधावे लागत नाही. तो फक्त अनुभवायचा असतो. मनसोक्त कसं जगायचं हे ही चिमुकली पुस्तकं समजावून सांगतात, असा समृद्धीचा अनुभव आहे.
गुलजार यांचा 'सायलेन्सेस' हा कवितासंग्रह म्हणजे कवितांचा गुलदस्ता आहे, असे समृद्धीला वाटते. गुलजार आपल्या कवितेला आपले दु:ख वाटून घेणारा आणि मैत्रीचा हात देत आपले दु:ख हलके करणारा एक मित्रच समजतात. काहीशी गुंतागुंतीची पण गूढ अर्थ असलेली गुलजार यांची शैली समृद्धीला विशेष आवडते. नूर, दास्तान, नझ्म, जश्न, ख्वाब, गुलशन इ. शब्दांचे अर्थ आणि उर्दू भाषेचे सौंदर्य गुलजारांमुळे जाणवले, असे ती म्हणते.
संस्कृतीने नूर उन्नाहर ह्या पाकिस्तानी कवयित्रीचा 'यस्टर्डे आय वॉज द मून' हा कवितासंग्रह वाचल्यावरची तिची प्रतिक्रिया फारच महत्त्वाची आहे : 'तिच्यात आणि आपल्यात हजारो मैलांचं अंतर असलं तरी जगाच्या कोणत्याही कोप-यातील माणूस हा काही वेगळा नसतो. आभाळाच्या छताखाली वावरणारे आपण सर्व शरीराने कितीही वेगळे असलो तरी एकाच हवेत श्वास घेतो. वेगळ्या दृष्टीने विचार केला, तर आपली सर्वांची मनं, भावना, संवेदना ह्यासुद्धा एकमेकांशी मिळत्याजुळत्या असतात.
मुंबईतील रेश्मा कुरेशी ह्या सतरा वर्षांच्या मुलीवर एका दुष्ट माणसाने ॲसिडचा हल्ला केला. 'बिईंग रेश्मा' हे तिचे आत्मकथन वाचून समृद्धी फारच अस्वस्थ झाली. हे पुस्तक तिच्या काळजाला स्पर्शून गेले. ह्या अमानुषपणाबद्दल तिच्या मुठी रागाने आवळायला लागल्या. ही कथा वाचताना समृद्धीला चेह-यापलीकडचं सौंदर्य गवसलं.
रस्किन बॉंडचे 'रूम ऑन द रूफ' हे पुस्तक वाचल्यावर समृद्धी रस्टी ह्या नायकाच्या भावविश्वाशी एकरूप झाली. ह्या कादंबरीमुळे आपल्याला मैत्री, प्रेम, आत्मविश्वास ह्या मूल्यांचे मोल समजले, असे ती नमूद करते.
सुधा मूर्ती यांची 'डॉलर बहू' ही कादंबरी वाचल्यावर डॉलरपेक्षा आपल्या माणसांचे, त्यांच्या आपुलकीचे महत्त्व समजू लागते.
एखादं गाणं ऐकण्याएवढं सहज हे पुस्तक वाचता संपून जातं, हा समृद्धीचा वाचनानुभव आहे.
रिबेका मनारी यांच्या 'ब्राऊन' ह्या कादंबरीत समाईरा नावाच्या छोट्याशा सावळ्या मुलीची गोष्ट सांगितली आहे. स्वतःच्या रंगाचा मनोमन स्वीकार, आत्मविश्वास आणि स्वतःच्या मतावर ठाम राहण्याचा समाईराचा स्वभाव समृद्धीला फारच आवडला. समाईराच्या अनोख्या स्वप्नांची ही कहाणी समृद्धीला फारच आवडली. म्हणून तिने समाईराला जवळ केले. समाईराची ही कहाणी आत्मविश्वास वाढविण्याची प्रेरणा जागृत करते, असे समृद्धीला वाटते.
महाश्वेतादेवी यांची 'द व्हाय व्हाय गर्ल' ही मोयना नावाच्या, प्रश्नांनी झपाटलेल्या, दहा वर्षांच्या चौकस आणि चुलबुल्या मुलीची गोष्ट समृद्धीला फारच आवडली. ह्या मोयनाला अनेक प्रश्न सतावत असतात. ते प्रश्न समृद्धीच्या ह्रदयाला स्पर्शून जातात. महाश्वेतादेवींना पुस्तक वाचताना पाहून अशिक्षित मोयरा पुस्तक वाचायची इच्छा व्यक्त करते. मोयराची शिकण्याची इच्छा पाहून तिच्या छोट्या गावात शाळा सुरू करण्यात येते. मोयरा तिच्या उपजत जिज्ञासू वृत्तीमुळे वाचकाला 'का?' हा प्रश्न विचारायला प्रवृत्त करते, असे समृद्धी म्हणते आणि ते पटतेसुद्धा!
'लाईफ विदाऊट लिमिट्स' ह्या कादंबरीने समृद्धीला अक्षरशः झपाटले आहे. जन्मल्यापासून हात-पाय नसलेल्या निक वुईच ह्या माणसाची ही प्रेरणादायी गोष्ट आहे. ह्या पुस्तकाबद्दल समृद्धी लिहिते, की ह्या पुस्तकाने मला एक नवीन जीवन दाखविले. आपले किरकोळ दु:ख आणि त्रास यापलीकडेही भयाण संकटांना कवटाळून कितीतरी लोक जीवन जगत असतात. ते स्वतःचे दु:ख विसरून जगात आनंद पसरवण्याचे काम करत असतात. सकारात्मक जगण्याची प्रचंड ऊर्जा, निराकार तत्त्वावरची असीम श्रद्धा आणि मनातील अभंग जिद्द ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वात असतील, तर अशक्य ते शक्य होऊ शकते, हेच समृद्धीला ह्या पुस्तकातून जाणवले.
कमी वयात शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेली मलाला युसुफजाई ही जगभरात प्रसिद्ध आहे. 'आय ॲम मलाला' हे तिचे आत्मकथन वाचून समृद्धी फारच प्रभावित झाली आहे. भयानक परिस्थितीशी लढून, स्वतःसोबत इतरांनाही त्यांचे हक्क मिळवून देणारी मलाला ही 'इच्छा तिथे मार्ग' ह्या विधानाचे मूर्तिमंत उदाहरण बनून पुढे आली आहे, असे समृद्धीला वाटते.
समृद्धी केरकर हिने वाचलेल्या आणि लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकाविषयी इथे लिहिणे शक्य आहे, पण ते व्यवहार्य नाही. हा लेख म्हणजे 'शब्दगंध'पर्यंत घेऊन जाणारी पाऊलवाट आहे. जिज्ञासू वाचकांनी 'शब्दगंध' हे पुस्तक मुळातून वाचावे, यासाठी ही केवळ ओळख करून दिली आहे. 'शब्दगंध' वाचत असताना आपल्या असे लक्षात येते, की अशा ऐसपैस वाचनातूनच समृद्धीमधील आश्वासक लेखिका घडत गेली आहे. त्या पुस्तकांच्या वाचनात ती इतकी गुंतत गेली आहे, की कधी ती भावविवश होते, तर कधी अंतर्मुख होऊन विचार करू लागते. पुस्तकातील पात्रांच्या ठिकाणी ती स्वतःला शोधू लागते. पुस्तकातील पात्रांशी ती मनमोकळा संवाद साधते. वाचन हे तिच्या दृष्टीने कर्मकांड नाही, तर तो तिच्या जडणघडणीचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या जाणिवांना आकार देण्यासाठीच तिने हे वाचन केले आहे. वाढत्या वयाबरोबर माणसे निबर बनत जातात, पण समृद्धीने आपला निरागसपणा आणि मनाची कोवळीक अजून जपलेली आहे, याची प्रचिती येते.
रवींद्रनाथ टागोर, सुधा मूर्ती, रॉबिन शर्मा, रस्किन बॉंड, पाउलो कोईलो, महाश्वेतादेवी, गुलजार इ. महत्त्वाच्या लेखक-कवींची महत्त्वाची पुस्तके तिने आवडीने वाचली आहेत आणि त्यांचे विचारविश्व समजून घेतले आहे. ह्या विचारविश्वात जाणीवपूर्वक अवगाहन केले आहे.
ह्या लेखनात केवळ प्रसिद्धीची हौस नाही, तर अभिव्यक्तीची असोशी आहे, अपरिहार्यता आहे.
आपण इतकी पुस्तके वाचली याचा कुठेही अहंकार जाणवत नाही. उलट त्या पुस्तकांविषयीची कृतज्ञता मात्र आहे. हे लेखन म्हणजे समृद्धीने त्या लेखकांच्या सोबतीने केलेला विचारविश्वाचा आणि भावविश्वाचा सहप्रवास आहे. ह्या लेखनात समृद्धी कुठेही स्वतःचे समर्थन करत नाही, तर स्वतःला बदलून घेण्याचा प्रयत्न करते. ती आपली मते वाचकांवर लादत नाही, तर वाचकांना विचारप्रवृत्त करते. समृद्धीच्या वयाच्या तुलनेत, ह्या लेखनात कमालीची प्रगल्भता जाणवते. समृद्धी ही एक सिद्धहस्त चित्रकार असल्यामुळे स्वाभाविकपणे तिच्या लेखनातही चित्रमयता आली आहे. अतिशय नितळ मनाने केलेले हे लेखन तितकेच नितळ आणि प्रांजळ उतरले आहे. समृद्धीचे हे आस्वादपर लेखन वाचकालाही समृद्ध करून जाते, हे नक्की!

- 'शब्दगंध' (आस्वादपर लेखन)
- लेखिका : समृद्धी राजेंद्र केरकर
- प्रकाशक : विवेकानंद साहित्य संस्कृती अभिवृद्धी मंच, सत्तरी-गोवा
- आर्ट पेपरवरील रंगीत पृष्ठे १८०, किंमत रु. ७००
- पुस्तक परिचय :
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड
- sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS