केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
केशव पवार लोहा,
तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आणि लोहा पोलिसांनी बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास संयुक्त कारवाई करत कापसाच्या पिकातून गांजाची तब्बल २५ झाडे जप्त केली. जप्त केलेल्या गांजाचे वजन सुमारे २१ किलो ७५० ग्रॅम असून, त्याची अंदाजे किंमत १० लाख ८७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोखरी येथील शेतकरी राजाराम ताटे यांच्या कापसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथक आणि लोहा पोलिसांनी संयुक्तपणे संबंधित शेताची पाहणी केली.
यावेळी कापसाच्या पिकामध्ये गांजाची २५ झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून गांजाची झाडे ताब्यात घेतली. या कारवाईदरम्यान एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
गांजाची शेती नेमकी कधीपासून?
कापसाच्या पिकाच्या आड गांजाची लागवड करण्यात आल्याने या प्रकरणाची पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे. गांजाची लागवड करण्यामागे नेमका उद्देश काय होता, लागवड किती कालावधीपासून सुरू होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास यंत्रणा माहिती घेत आहे.
ही कारवाई अमली पदार्थ विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लोहा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद घोडके, पोलिस निरीक्षक दिगंबर कोपरे, पोलिस उपनिरीक्षक नितीन पवार, संतोष पाटील, पोलिस अंमलदार तानाजी येळगे, शंकर गायकवाड, गणेश जाधव, महेंद्र दासरेवार, नरेंद्र तिडके यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
कापसाच्या आड ‘गांजाची शेती’
पोखरी येथील कापसाच्या शेतात गांजाची झाडे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला असून, या लागवडीमागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

COMMENTS