स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल आणि संशोधन केंद्राच्या वतीने 'जफरनामा' या महत्त्वपूर्ण विषयावर शनिवार, दि.२८ मार्च रोजी विद्यापीठातील अधिसभा सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री मंठळकर तसेच श्रीमती अनिलकौर रामगडिया उपस्थित होते. त्यांनी 'जफरनामा' या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या जीवनातील आदर्श, सत्यनिष्ठा, धैर्य आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा यावर विशेष प्रकाश टाकला. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने या मूल्यांचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
'जफरनामा' हे श्री गुरु गोबिंदसिंघजी यांनी औरंगजेबाला लिहिलेले ऐतिहासिक पत्र असून, त्यामध्ये सत्य, न्याय आणि धर्मनिष्ठेचा प्रभावी संदेश दिलेला आहे. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचा बोध या पत्रातून मिळतो, असेही वक्त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री गुरु गोबिंदसिंघजी अध्यासन संकुल आणि संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश निहालानी तसेच विद्यापीठाचे कर्मचारी विष्णू भुसारे, सुरेश देशमुख, साहेबराव लुटे, संकेत साखरे, अजय इंगोले, शिल्पा धनमने आदींची उपस्थिती होती.

COMMENTS