नांदेड:( दि. १ मार्च २०२६)
भगवान रजनीश मेडिटेशन इंटरनॅशनल कम्यून, निळा रोड येथे भगवान रजनीशद्वारे निर्मित सक्रिय ध्यान विश्वव्यापी महाअभियानांतर्गत १ मार्च ते २१ मार्च दरम्यान आयोजित केले आहे. ध्यान अभियानाचा प्रारंभ दि.१ मार्च रोजी सकाळी ७ वाजता झाला.
या अभियानाचे उद्घाटन माजी उपमहापौर प्रा.सुनील नेरळकर यांनी केले. उद्घाटकीय मनोगतात त्यांनी, आधुनिक माणसाचे रुग्ण आणि दमित मनाचे रेचन करण्यासाठी सक्रिय ध्यान एक उत्तम ध्यान असल्याचे प्रतिपादन केले. सलग २१ दिवस ध्यान केल्यास मनुष्याला सहजता, स्वास्थ्य, आनंद याचा निश्चित अनुभव येईल आणि त्याच्या मनातील क्रोध, घृणा, द्वेष, चिंता, अस्वस्थता, संताप दूर होतील, भगवान रजनीश यांच्या हस्ते ५० वर्षांपूर्वी संन्यासीत स्वामी गोपाळ भारती यांच्या मार्गदर्शनानुसार ध्यानाचे नियोजन केले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी स्वामी प्रशांत, मा सुगंधा, प्रा.महेंद्र देशमुख, संगीता देशमुख, सुरेश धूत, डॉ.अजय गव्हाणे, प्रा.नारायण शिंदे, अमृता मुखेडकर, श्यामसुंदर मोतेवार, अशोक बोधनकर, मा प्रीतम आणि इतरही बहुसंख्य साधकांची उपस्थिती होती. दररोज सकाळी सात ते आठ या दरम्यान दि.२१ मार्च पर्यंत सक्रिय ध्यान नियमित आयोजित केले जाईल, असे आयोजकांनी सांगितले.

COMMENTS