या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार हे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,सल्लागार एकनाथराव मामडे, उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष अनिल मनाठकर, बांधकाम समितीचे सचिव सदानंद मेडेवार, कार्याध्यक्ष सुमित रुद्रवार, नागपूर येथील उद्योजक दीपक निलावार, किनवटचे माजी नगराध्यक्ष दिनकरराव चाडावार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, नांदेड जिल्हा ग्रामीणचे माजी अध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, दिग्रस नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिरवार, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र कोडगिरवार, महासभेच्या महिला अध्यक्षा माधुरीताई कोल्हे, कार्याध्यक्षा सुलभाताई वट्टमवार, कोषाध्यक्षा अर्चनाताई ढमढेरे यांच्या सह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
दिनांक 31 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी चार वाजता आर्य वैश्य समाजाच्या नियोजित जागेवर आर्य वैश्य कॉलनी येथे मंगल कार्यालयाचे भूमिपूजन होईल. त्यानंतर उर्वरित कार्यक्रम सुमन मंगल कार्यालय हदगाव येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. वास्तू देणगीदार, ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार, पदग्रहण समारंभ आदी सर्व कार्यक्रम सुमन मंगल कार्यालयात संपन्न होतील. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रभाकर पत्तेवार यांच्यासह हदगाव येथील आर्य वैश्य समाज, आर्य वैश्य महासभा नांदेड ग्रामीणचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ, भूमिपूजन या समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या स्वागतासाठी हदगाव येथील आर्य वैश्य समाज बांधव सज्ज झाले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे माजी राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिली आहे.

COMMENTS