नगर परिषदेच्या गाळ्यांतील ‘पोटभाडेकरूंचा’ बाजार उठणार..!

सर्वेक्षण करून नियमभंग करणाऱ्या मूळ भाडेकरूंचे वाटप रद्द होणार बांधकाम सभापती राम नेम्मानीवार यांचा ‘ऍक्शन प्लॅन’ किनवट प्रतिनिधी : नगर परिष...

सर्वेक्षण करून नियमभंग करणाऱ्या मूळ भाडेकरूंचे वाटप रद्द होणार

बांधकाम सभापती राम नेम्मानीवार यांचा ‘ऍक्शन प्लॅन’
किनवट प्रतिनिधी : नगर परिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा वापर नियम धाब्यावर बसवून होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक मूळ भाडेधारकांनी नगर परिषदेकडून अत्यल्प दरात घेतलेले गाळे अव्वाच्या सव्वा दरात ‘पोटभाडेकरूंना’ दिल्याचे उघड होत आहे. या अनधिकृत व्यवहारांमुळे नगर परिषदेचा महसूलही बुडत असल्याने सर्व गाळ्यांचे सर्वेक्षण करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम सभापती राम नेम्मानीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नगर परिषदेकडून शहरातील सुशिक्षित बेरोजगार व छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी अल्प दरात गाळे उपलब्ध करून दिले जातात. मात्र अनेक भाडेधारकांनी हे गाळे स्वतः व्यवसायासाठी न वापरता दुसऱ्यांना पोटभाड्याने दिल्याचे समोर आले आहे. नगर परिषदेच्या करारानुसार गाळे पोटभाड्याने देण्यास सक्त मनाई असतानाही अनेक व्यापारी संकुलांमध्ये ही प्रथा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
यापैकी काही गाळ्यांमध्ये मटका, जुगार, लॉटरी, देशी दारू तसेच परवाना नसलेले इतर व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गाळ्यांची परस्पर लाखो रुपयांत विक्री झाल्याचीही चर्चा आहे. या संदर्भात जागरूक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर बांधकाम सभापती राम नेम्मानीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष ‘ऍक्शन प्लॅन’ तयार केला आहे. लवकरच सर्व व्यापारी गाळ्यांचे सर्वेक्षण करून प्रत्यक्ष जागेवर तपासणी करण्यात येणार आहे. गाळ्यात व्यवसाय करणारी व्यक्ती मूळ भाडेधारक आहे की पोटभाडेकरू, याची पडताळणी केली जाईल.
करारातील अटी-शर्तींचा भंग करणाऱ्या भाडेधारकांना तत्काळ नोटिसा बजावण्यात येतील. नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास संबंधित मूळ भाडेकरूचे वाटप रद्द करून गाळा पुन्हा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्याची कारवाई केली जाईल, असे नेम्मानीवार यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या पारदर्शक व शिस्तबद्ध कारभाराला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून ‘गाळे अपडेटिंग’ मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, किनवट शहरातील वाढत्या बाजारपेठेच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून अनेक वर्षांपासून गाळ्यांचा ‘गुंतवणूक’ म्हणून अनधिकृत वापर करणाऱ्यांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel