नांदेड जिल्ह्यातील जवळपास 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता.
त्यात महात्मा फुले हायस्कूल मधील इयत्ता 9 वी चे विद्यार्थी चि. आनंद प्रल्हाद सेवकर व चि. आयुष सतीश मोरे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला. सदरील विद्यार्थ्यांना रोख रक्कम 7000 रुपये, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांनी 'स्मार्ट व्हायब्रोथेरपी सिस्टीम' ही आनंद टेक्नॉलॉजीद्वारे विकसित केलेली एआय (AI) आधारित वैद्यकीय सहाय्यक प्रणाली आहे. ही मशीन शस्त्रक्रिया विभागात, अतिदक्षता विभागात, तसेच शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांसाठी तयार केली आहे. नियंत्रित व्हायब्रेशन तंत्रज्ञानाद्वारे स्नायू सक्रिय करणे, रक्तप्रवाह वाढवणे आणि वेदना कमी करणे यासाठी ती उपयोगी ठरते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार वेळ आणि तीव्रता नियंत्रित करता येते. कमी खर्चात अधिक फिचर्स देणारी ही स्वदेशी प्रणाली या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवून सन्मानित झाली.
संस्थेचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण , उपाध्यक्षा माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण,आ. ॲड. श्रीजयाताई चव्हाण, राज्याचे माजी मंत्री तथा संस्थेचे सचिव डी. पी. सावंत , सहसचिव, डॉ.रावसाहेब शेंदारकर , खजिनदार ॲड.उदय?निंबाळकर ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा कदम , उपमुख्याध्यापक ए. आर. कल्याणकर , पर्यवेक्षक डी. एल. खानजोडे , एस. व्ही. जाधव , दिपक खंदारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान विषयाचे ज्येष्ठ अध्यापक पी. आर. कोत्तावार , ए. डी. रायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले.

COMMENTS