हिंगोली प्रतिनिधि : पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने ...
हिंगोली प्रतिनिधि : पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने लढा देणारे 'दैनिक भास्कर'चे जिल्हा प्रतिनिधी राकेश भट्ट यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा राज्यस्तरीय 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुणे येथील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी १८ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. येत्या २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव प्रदान करण्यात येणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल
राकेश भट्ट यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Medical College), एमआरआय (MRI) मशीन आणि आयुष रुग्णालयाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. शासनाच्या आरोग्य योजनांची जनजागृती करून जनसहभाग वाढवण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली आहे.
पुरस्काराचे स्वरूप
१ लाख रुपये रोख
सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
पुरस्कारांचा 'महामेरू'
राकेश भट्ट यांच्या शिरपेचात हा मानाचा तुरा पहिल्यांदाच खोवला गेलेला नाही. यापूर्वीही त्यांच्या कार्याचा गौरव राज्यस्तरावर झाला आहे:

२०१४: राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.
- २०११ ते २०१३: सलग तीन वर्षे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत 'यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार'.
- २०११: गृह मंत्रालयाचा 'महात्मा गांधी तंटामुक्ती' पुरस्कार.
- २०१४: राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार.
- पत्रकारितेतील मानाचा 'दर्पण पुरस्कार' देखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

COMMENTS