नांदेड, १८ फेब्रुवारी २०२६: राज्यभरात सुरू असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या काळात पारदर्शकता आणि शिस्त जपण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन अत्यंत सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील परीक्षा केंद्रांवर कडक पाळत ठेवली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. कंधार तालुक्यात भरारी पथकाचा 'छापा'
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विशेष भरारी पथकाने (Flying Squad) आज कंधार तालुक्यातील पेडवडज येथील संत नामदेव महाराज ज्युनिअर कॉलेज केंद्रावर अचानक भेट दिली. या तपासणीदरम्यान परीक्षेतील गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत.
दोन परीक्षार्थींवर कारवाई
तपासणी पथकाने केंद्रावरील बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिकांची सुरक्षा आणि पर्यवेक्षकांचे कामकाज यांची बारकाईने पाहणी केली. यावेळी दोन परीक्षार्थी कॉपी करताना रंगेहात पकडले गेले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या विद्यार्थ्यांवर तत्काळ नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून, त्यांचा सविस्तर अहवाल सक्षम प्राधिकरणाकडे सोपवण्यात आला आहे.
बारावी परीक्षेत हलगर्जीपणा; पथक प्रमुखांसह केंद्रसंचालक निलंबित!नांदेड, १८ फेब्रुवारी २०२६:
बारावी बोर्डाच्या रसायनशास्त्र आणि राज्यशास्त्र पेपरदरम्यान कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासनाने थेट निलंबनाचे आदेश दिले आहेत.
प्रमुख कारवाया:
उमरी केंद्र: नूतन उच्च माध्यमिक विद्यालयातील बैठे पथक प्रमुख नरहरी मुंजाळ (विस्तार अधिकारी), सदस्य मोहन भोसले व पांडूरंग गुब्रे हे पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
• किनवट (दहेली तांडा) केंद्र: स्व. संगितादेवी आश्रमशाळेत एका विद्यार्थ्यावर कॉपीची कारवाई. तसेच, सीसीटीव्ही आणि भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे केंद्रसंचालक श्री. गुट्टे आणि मुख्याध्यापक पांडूरंग आडे यांना निलंबित करण्याचे निर्देश.
• कंधार (पेठवडज) केंद्र: संत नामदेव महाराज कॉलेजमध्ये २ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई केली असून येथील केंद्रसंचालक तडकाफडकी बदलले आहेत.

COMMENTS