माहूर | विशेष प्रतिनिधी पवित्र शक्तीपीठ आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या माहूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ती 'माह...
माहूर | विशेष प्रतिनिधी पवित्र शक्तीपीठ आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या माहूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ती 'माहूर नगर पंचायत' स्वतःच अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे. नगर पंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्या आज खर्र्याच्या लालभडक पिचकाऱ्यांनी अक्षरशः माखलेल्या दिसत आहेत. हे चित्र पाहून संताप व्यक्त होत असून, प्रशासनाचा स्वतःच्याच कार्यालयावर वचक उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की अभय?: नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तरीही त्यांनी आजवर कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने, हा प्रकार त्यांच्या संमतीनेच सुरू आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
कर्मचारीच बनले 'व्हिलन': कार्यालयातील काही कर्मचारी ड्युटीवर असताना राजरोसपणे खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. जनतेची कामे करण्याऐवजी व्यसनाला प्राधान्य देणारे हे कर्मचारीच पायऱ्यांवर थुंकून नियमांची पायमल्ली करत आहेत.
स्वच्छतेचा 'दिवाळीखाली अंधार': शासन स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करून जनजागृती करत आहे. मात्र, माहूर नगर पंचायतीत "दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण" अशी परिस्थिती आहे. जे कार्यालय शहराला शिस्त लावणार, तेच आता 'पिचकाऱ्यांचे केंद्र' बनले आहे.
CC-TV ची भीती कुणालाच नाही?: कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असूनही कर्मचारी निर्धास्तपणे अस्वच्छता पसरवत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी या फुटेजची तपासणी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

"साहब, जर तुमचे स्वतःचे कार्यालय पिचकाऱ्यांनी रंगलेले असेल, तर तुम्ही कोणत्या तोंडाने शहरवासीयांना स्वच्छतेचे आवाहन करणार? ही माहूरच्या जनतेची आणि तीर्थक्षेत्राच्या पवित्रतेची थट्टा नाही का?"

COMMENTS