दि. 17. ता. प्र.
महामानव महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंतीनिमित्त अंबाडी तांडा ता. किनवट जि. नांदेड येथे 15 तारखेला एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव नाईक सामाजिक व ग्रामविकास बहुउद्देशीय सेवा भावी संस्था आदर्शगांव अंबाडी तांडाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जोशना कैलास जाधव तर प्रमुख प्रशिक्षक म्हणून शेतकरी संघटनेचे रमेश कदम पाटील, मंडळ कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड, ग्राम विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, डॉ वर्षा गोवंदे सि.एच.ओ. यांनी गावकऱ्यांना आदर्शगाव, योजना, सप्तसुत्री, शेती व शेतकरी गट, आरोग्य विषयक जागृती, सामाजिक सलोखा, याविषयी सरळ व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. अंबाडी तांडा आदर्श गाव मोहीम किनवट तालुक्याला दिशादर्शक ठरेल असा विश्वास यावेळी रमेश कदम यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम कार्यकर्ता अरविंद जाधव, नवयुवक पृथ्वीराज कैलास जाधव, संस्थापक सचिव सचिन जाधव यांनी अथक प्रयत्न केले.
या कार्यक्रमास कैलास मंगुसिंग जाधव, मा.सरपंच किशनराव लखुजी राठोड, रामदास शेडमाके उपसरपंच व ग्राम पंचायत चे सर्व सदस्य उपस्थित होते. मा.बालुसिंग पवार तंटामुक्ती अध्यक्ष, महिला बचत गटाच्या सिआरपी सुमीत्रा मोहुर्ले, रेणुकाबाई राठोड, शांताबाई लोभाजी जाधव, जेष्ठ नागरिक मंगुसिंग जाधव व संस्थापक सदस्य गुलाब सिताराम मडावी, सर्व महिला बचत गटांच्या सदस्या, शेतकरी, शेतमजूर मोठया संख्येने उपस्थित होते.
सर्व प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा आदर्शगांव व प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा आदर्शगांव अंबाडी तांडा वतीने घेण्या आला. संस्थेचे मनुष्यबळ व समाजीक कार्यकर्ते विनोदजी कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन मोहन जाधव अंबाडीकर संस्थापक अध्यक्ष वसंतराव नाईक सामाजिक व ग्रामविकास बहुउद्देशीय सेवा भावी संस्था आदर्शगांव अंबाडी तांडा यांनी केले.

COMMENTS