महामार्ग क्र. १६१ (ए) खड्ड्यांच्या विळख्यात; आठ वर्षांच्या दुर्लक्षाने प्रवासी हैराण !

रखडलेले काम, विभागांची ढकलाढकली; किनवट–नांदेड प्रवास त्रासदायक किनवट (प्रतिनिधी): नांदेड–भोकर–हिमायतनगर–किनवट–माहूर–धनोडा या राष्ट्रीय महामा...
रखडलेले काम, विभागांची ढकलाढकली; किनवट–नांदेड प्रवास त्रासदायक
किनवट (प्रतिनिधी): नांदेड–भोकर–हिमायतनगर–किनवट–माहूर–धनोडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (ए) ची अवस्था गंभीर बनली असून धानोरा घाट ते सावरीदरम्यान रस्ता खड्ड्यांनी विदीर्ण झाला आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची अक्षरशः कसरत सुरू असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
किनवट ते नांदेड या सुमारे १५० किमी प्रवासात प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. वनजमिनीतील प्रलंबित काँक्रिटीकरणामुळे करण्यात आलेले तात्पुरते डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून गोकुंदा परिसरात रस्त्याची परिस्थिती बिकट झाली आहे. घोटी–कमठाला दरम्यान नुकत्याच घडलेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाल्याने धोक्याची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान, उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे त्रास आणि सततच्या धक्क्यांमुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. आपत्कालीन रुग्ण व गर्भवती महिलांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या कथित दुर्लक्षामुळे गोकुंदा–किनवट मार्गाची दुरवस्था गेली आठ वर्षे कायम असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. धनोडा–चिखली मार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून उड्डाणपूलाच्या कारणास्तव सेंट मेरी स्कूल ते गोकुंदा पेट्रोलपंपदरम्यानचा रस्ता रखडलेलाच आहे. परिणामी या भागात खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या किनवट भेटीदरम्यान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे, गोकुंदा उपसरपंच सरू शेख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण मॅकलवार यांनी निवेदन देत रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group