किनवट : प्रतिनिधी : किनवट पोलीस ठाणे हद्दीत राबविण्यात आलेल्या ‘मास रेड’ मोहिमेत मटका जुगार व गावठी दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करण्यात आ...
किनवट : प्रतिनिधी : किनवट पोलीस ठाणे हद्दीत राबविण्यात आलेल्या ‘मास रेड’ मोहिमेत मटका जुगार व गावठी दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. शहर व परिसरातील विविध ठिकाणी धाड टाकून मटका अड्ड्यांवर दोन तसेच गावठी दारू विक्रेत्यांवर दोन अशा एकूण चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कारवाईत मटका जुगार प्रकरणी विठ्ठल खंडू गीमेकर (वय ५२, रा. घोटी, ता. किनवट, जि. नांदेड) याच्या ताब्यातून ८५० रुपये रोख रक्कम, मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, दोन कागदी चिठ्ठ्या व एक बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सदाशिव माणिकराव अनंतवार यांनी फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या कारवाईत देवराव सोनबा बोरकर (वय ५८, रा. कोठारी, ता. किनवट, जि. नांदेड) याच्याकडून १,०५० रुपये रोख रक्कम तसेच मटक्याच्या चिठ्ठ्या व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी बाळू भुजंगराव कुडमेते यांनी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, गावठी दारू प्रकरणी इलवंत महादू मुरमुरे (वय ५३, रा. बोधडी, ता. किनवट) याच्या ताब्यातून प्रत्येकी २० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक कॅनमध्ये एकूण ४० लिटर हातभट्टीची दारू (अंदाजे किंमत ४ हजार रुपये) जप्त करण्यात आली. बेकायदेशीररित्या विक्रीसाठी माल साठविल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील सर्व प्रकरणांमध्ये आर्थिक फायद्यासाठी ‘टाईम ओपन’ नावाचा मटका जुगार चालवित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मा. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास हवालदार सीरमनवार व हवालदार वाघमारे करीत आहेत.
दरम्यान, अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS