भोकर ( प्रतिनिधी )भोकर येथील दैनिक भास्करचे पत्रकार व ज्येष्ठ समाजसेवक कै. अहेमदभाई करखेलीकर यांचे निधन झाले आहे. निधनसमयी त्यांचे वय ६५ वर...
भोकर ( प्रतिनिधी )भोकर येथील दैनिक भास्करचे पत्रकार व ज्येष्ठ समाजसेवक कै. अहेमदभाई करखेलीकर यांचे निधन झाले आहे. निधनसमयी त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह भोकर शहरावर शोककळा पसरली आहे. कै. करखेलीकर यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले होते. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी १० वाजता भोकर येथील ईदगा उमरी रोड भोकर येथे अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहीण तसेच १२ पुतणे असा परिवार आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच श्रद्धांजली.

COMMENTS